तक्रारीचे निवारण २४ दिवसाच्या आत होणार
जळगाव (प्रतिनिधी) – नागरिक आणि प्रशासन यांना ऑनलाईन संवाद साधण्यासाठी राज्यातील नागरिकांना ऑनलाईन पध्दतीने तक्रार दखल करता यावी तसेच प्रशासनाने ऑनलाईन पध्दतीने अशा तक्रारींचे २१ दिवसांचे आत तक्रारींचे निवारण करण्यासाठी आपले सरकार ही तक्रार निवारण प्रणाली शासनाने कार्यान्वीत केलेली आहे. सदर तक्रार निवारण प्रणाली www.aaplesarkar.maharashtra.
याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून नागरिकांनी त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आपले सरकार या ऑनलाईन् प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करावा असे निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी कळविले आहे.