भुसावळ (प्रतिनिधी) – येथील मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळात नोकरी मेळावा आयोजित करण्यात आला. नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
केंद्र सरकारने सुरू केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार भुसावळ मंडळात “नोकरी मेळावा” आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्र शासनाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले, त्याचा लाभ उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी व नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी घेतला. यावेळी नव्याने रुजू झालेल्या ३ कर्मचाऱ्यांना विभागीय रेल्वे व्यवस्थापक इती पांडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. उमेदवारांनी रेल्वेतील भरती प्रक्रिया वेळेवर आणि पारदर्शकतेने पार पडल्याचे सांगितले.
अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासकीय) सुनील कुमार सुमन, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) कौशलेंद्र कुमार, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.एस.काझी, सहाय्यक कार्मिक अधिकारी व्ही.एस. वडनेरे, सहाय्यक कार्मिक अधिकारी सुशीलकुमार पांडा उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्मिक अधिकारी व्ही.एस.वडनेरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कल्याण निरीक्षक, कार्मिक विभाग, भरती विभाग, एस अँड टी विभाग आणि विद्युत विभाग, अभियांत्रिकी विभाग यांनी सहकार्य केले.