भुसावळ तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद; ओळख पटविण्याचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी):- भुसावळ तालुक्यात रेल्वे ट्रॅकजवळ एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीचे वय अंदाजे ५५ ते ६५ वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले.


मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे खांबा क्रमांक ४३९/१० ते ४३९/१२ दरम्यान अपलाईन व तिसऱ्या लाईनमधील गटाराजवळ हा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास पोहेकाॅ. वाल्मिक सोनवणे करीत आहेत.









