आपत्ती व्यवस्थापनकडून शोध सुरु
रावेर (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील सुकी नदीच्या पात्रातून एक तरूण बेपत्ता झाला असून एनडीआरएफची टिम शोध घेत आहे. घटनेवर स्थानिक तालुका प्रशासन लक्ष ठेऊन आहे. रावेर तालुक्यात सकाळ पासुन संततधार पाऊस कोसळत आहे.
तहसिलदार बंडू कापसे घटनास्थळी दाखल झाले असुन बेपत्ता झालेल्या युवकाचा एसडीआरएफ मार्फत शोध सुरु आहे. रावेर तालुक्यातील रोझोदा येथील रवींद्र दगडू चौधरी हा तरूण गारबर्डी धरण परिसरामध्ये काल सायंकाळी पोहायला गेला होता.पोहत असतांना अचानक तो नदी पात्रात बेपत्ता झाला. घटनेची माहीती तहसिलदार बंडू कापसे यांना मिळताच एसडीआरएफच्या टीमसह घटनास्थळी पोहचले असुन बेपत्ता झालेल्या युवकाचा शोध सुरु आहे. सुकी नदीला दोन्ही काठ भरून पाणी वाहत असुन यात बेपत्ता युवकाचा एसडीआरएफची टीम शोध मोहीम राबवित आहेत. तर आज सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा एकदा तालुक्यात मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.