

मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील रहिवासी असलेल्या पीडित मुलीचा विवाह तिच्या वडिलांनी २०२५ मध्ये ती अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही कोणासही न सांगता घाडवेल (ता. चोपडा) येथील आकाश प्रकाश भिल याच्याशी लावून दिला होता. लग्नानंतर पीडिता पतीसोबत घाडवेल येथे राहत असताना शारीरिक संबंधातून ती गर्भवती राहिली. २८ एप्रिल २०२६ रोजी पीडितेने जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला.
रुग्णालयात उपचार सुरू असताना अमळनेर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक कविता ठाणगे यांनी पीडितेचा जबाब नोंदवला. या जबाबातून बालविवाहाचा आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा गंभीर प्रकार उघडकीस आला. त्यानुसार, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ८३/२०२६ नुसार आकाश प्रकाश भिल (पती), प्रकाश भिल (सासरा) आणि संतोष पंडित भिल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून बालविवाहाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. घटनेचा पुढील तपास चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश टाक हे स्वतः करत आहेत.









