जळगाव (प्रतिनिधी ) – जिल्हा कोवीड रुग्णालयाने आज पाठवलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात दिवसभरात एक बाधित रुग्ण आढळला असल्याची अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७४७ बाधित रुग्ण आढळून आले आहेयापैकी १ लाख ४० हजार १६० रुग्ण बरे होऊन घरी परतला आहे. त्याचप्रमाणे २ हजार ५७५ रुग्ण उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज चाळीसगाव तालुक्यात एक रुग्ण आढळला आहे. जिल्ह्यात सध्या १२ रुग्ण ॲक्टिव्ह आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी आज सायंकाळी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.