• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

खडसे पिता-कन्येला मोठा दिलासा! बोदवड पोलीस ठाण्यात दाखल ॲट्रॉसिटी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 28, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश


भुसावळ सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; २५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन, दोन्ही बाजूंनी न्यायालयात झाली जोरदार युक्तिवाद!

बोदवड ( प्रतिनिधी ) :- राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या बोदवड येथील जमीन खरेदी आणि ॲट्रॉसिटी प्रकरणातील संशयित आरोपी आमदार एकनाथराव खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा एकनाथराव खडसे यांना न्यायव्यवस्थेकडून मोठा दिलासा मिळाला आहे. बोदवड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फसवणूक, बनावट दस्तऐवज आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गतच्या गुन्ह्यात भुसावळ येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर खडसे पिता-कन्येचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यामुळे खडसे समर्थकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

कारखान्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा होता आरोप

या खळबळजनक प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, ३० मार्च २०२६ रोजी बोदवड पोलीस ठाण्यात ८२ वर्षीय वृद्ध महिला चमेलीबाई तुकाराम तायडे यांनी आमदार एकनाथराव खडसे आणि शारदा खडसे यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाची तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार, फिर्यादी यांची महार इनाम वतन जमीन ‘तापी पूर्ण साखर कारखाना’ उभारण्यासाठी कारखान्याच्या नावे खरेदी करत असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच कुटुंबातील सदस्यांना रोजगार देण्याचे आमिषही देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात ही जमीन कारखान्याच्या नावे न करता एकनाथराव खडसे यांच्या कन्या शारदा खडसे यांच्या नावावर खरेदी करण्यात आली आणि जमिनीचा योग्य मोबदला दिला गेला नाही, असा आरोप फिर्यादींनी केला होता. याशिवाय दुय्यम निबंधक कार्यालयात शारदा खडसे उपस्थित नसतानाही मूळ खरेदीखतात खाडाखोड करून बनावट दस्तऐवज तयार करण्यात आले, असाही ठपका तक्रारीत ठेवण्यात आला होता.

या कलमांखाली नोंदवला होता गुन्हा

या तक्रारीवरून बोदवड पोलिसांनी आमदार एकनाथराव खडसे आणि शारदा खडसे यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्याचे कलम ३(१)(f), ३(१)(g) आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१६(२), ३१८(४), ३३६(२), ३(५), ३३६(३), ३४० नुसार फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले होते.

भुसावळ सत्र न्यायालयात रंगला युक्तिवाद

गुन्हा दाखल होताच अटकेची टांगती तलवार टाळण्यासाठी आमदार एकनाथराव खडसे आणि शारदा खडसे यांनी २९ एप्रिल २०२६ रोजी भुसावळ येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज (क्रमांक १९३/२६) दाखल केला होता. सत्र न्यायाधीश श्री. एस. टी. सूर यांच्या न्यायालयात या अर्जावर २८ मे २०२६ रोजी अंतिम सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आपापला युक्तिवाद न्यायालयात आक्रमकपणे मांडला. अखेर दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने आमदार एकनाथराव खडसे आणि शारदा खडसे यांना प्रत्येकी २५,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.

न्यायालयात दोन्ही पक्षांकडून कायदेतज्ज्ञांची फौज

या हायप्रोफाईल खटल्यात दोन्ही बाजूंनी नामवंत वकिलांनी काम पाहिले. आमदार एकनाथराव खडसे यांच्यातर्फे ॲड. अकिल इस्माईल आणि ॲड. हरुल देवरे यांनी बाजू मांडली, तर शारदा खडसे यांच्या वतीने ॲड. अतुल सूर्यवंशी आणि भुसावळचे ॲड. गजानन पाटील यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. दुसरीकडे, सरकार पक्षातर्फे ॲड. सोनवणे यांनी काम पाहिले, तर मूळ फिर्यादी चमेलीबाई तायडे यांच्या वतीने ॲड. सुशील अत्रे, ॲड. पंकज अत्रे आणि ॲड. अविनाश पाटील यांनी न्यायालयात बाजू मांडून जामिनाला विरोध केला होता. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे खडसे कुटुंबाला तूर्तास अटकेपासून कायदेशीर संरक्षण मिळाले आहे.


 

 

Tags: khadse pita-kanela motha dilasa
Previous Post

महापालिकेच्या २६०४ गाळ्यांचा प्रश्न निर्णायक टप्प्यावर

Next Post

जळगाव पोलीस दलात मोठे फेरबदल; १०१ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव पोलीस दलात मोठे फेरबदल; १०१ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली

जळगाव पोलीस दलात मोठे फेरबदल; १०१ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon