जळगाव ( प्रतिनिधी ) – चोपड्याच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सैध्दांतिक व प्रात्यक्षिकासाठी तासिका तत्वावर शिल्पनिदेशक ,निदेशक यांची तात्पुरती नेमणूक केली जाणार आहे. विहित शैक्षणिक अर्हता व अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारांनी 8 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत. असे प्राचार्यांनी कळविले आहे.
संधाता, विजतंत्री, ॲटो इलेक्ट्रीकल, गणित , चित्रकला निदेशक या प्रत्येकी एक पदासाठी शैक्षणिक अर्हता शाखेतील पदवी, पदविका , आयटीआय व सीटीआयटीएस , सीटीआय, व्यवसायाची शिक्षकीय पदाची पात्रता संबंधित शाखेप्रमाणे राहील, फक्त पुर्णवेळ कामकाजाचा अनुभव ग्राह्य धरण्यात येईल. या पदांकरीता अनुभव पदवीसाठी एक वर्ष, पदवीसाठी दोन वर्ष, आयटीआयसाठी 3 वर्ष व एमएससीआयटी आवश्यक आहे. सैध्दांतिक प्रति तास रुपये 250 तर प्रात्यक्षिकासाठी प्रति तास 125 रुपये मानधन अनुज्ञेय राहील.
सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रतिसह प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वेले, (चोपडा) येथे अर्जासह 8 ऑक्टोबररोजी सकाळी 10.00 वाजता मुळ प्रमाणपत्रासह प्रत्यक्ष उपस्थित रहावे, प्राप्त अर्जापैकी पात्रताधारक उमेदवारांची निवड झाल्यावर ईमेल , भ्रमणध्वनीव्दारे कळविण्यात येईल. असे प्राचार्य, यांनी कळविले आहे.