जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथील घटना
जामनेर (प्रतिनिधी) – घराकडे वासरू गेल्याच्या कारणावरून वाईट वाटून दोन जणांनी एकाला लाकडी काठीने मारून दुखापत केल्याचा प्रकार तालुक्यातील हिवरखेडा बुद्रुक येथे दि. १९ रोजी सकाळी घडला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविंद्र प्रभाकर कोळी (वय ४०,रा. हिवरखेडा ता. जामनेर) हे शेती व्यवसाय करतात. दि. १९ रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांचे वासरू संशयित आरोपी अमोल प्रकाश सावळे आणि माधुरी अमोल सावळे सावळे यांच्या घराजवळ गेले. याचे वाईट वाटून त्यांनी रवींद्र कोळी यांना शिवीगाळ केली. तसेच, लाकडी काठीने त्यांच्या डाव्या बाजूला मारून दुखापत केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी रवींद्र कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ जयेंद्र पगारे करीत आहे.