मुंबई (वृत्तसंस्था ) ;- राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे (यांना मोठा दणका मिळाला आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी 13 तास कसून चौकशी केल्यानंर गिरीश चौधरींना रात्री अटक करण्यात आली. ईडीची सिडी लावण्याचा इशारा देणाऱ्या एकनाथराव खडसे यांना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. याआधी, भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांची जानेवारी महिन्यात ईडीने चौकशी केली होती.
पावसाळी अधिवेशनात विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासोबत गैरवर्तन केल्यामुळे भाजपचे 12 आमदार निलंबित झाले होते. अधिवेशन संपून काही तास उलटत नाहीत, तोच राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.