कामाशिवाय घराबाहेर पडू नका : जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
जळगाव (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घ्यावी. त्यांच्यासाठी शेडनेट, गोठ्याचा वापर करावा. तसेच फॉगिंग मशीन वापरावी. पिण्यासाठी पुरेसे पाणी ठेवावे. आता ग्रामीण भागात गिरणेचे आवर्तन सोडले आहे. त्यामुळे पाणी पुरेसे आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी दि. २५ मे रोजी दुपारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच, जिल्ह्यात तापमानाचा पारा हा ४५ ते ४६ दरम्यान असून व उष्णतेची जोरदार लाट असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असेही ते म्हणले.
नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. ३१ मे ते ७ जून दरम्यान उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. मतदान हे दि. २६ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ दरम्यान होणार असून मतमोजणी १ जुलै रोजी होईल. २० ठिकाणी मतदान केंद्र राहणार आहे. जिल्ह्यात उष्णतेची लाट आली आहे. (केजीएन) त्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सूचना देण्यात आल्या असून अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर जाऊ नका अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. सर्व आरोग्य विभागात ओआरएस उपलब्ध करण्यात आले असून कामगारांना उन्हात काम करण्यासाठी मनाई आदेश केला आहे.
आस्थापनांनी कामगारांकडून काम करताना त्यांना पिण्याचे पाणी, कुलर, सावलीची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशा सूचना दिल्या असून पालन न झाल्यास कारवाई करण्याबाबत विविध सरकारी यंत्रणा याना तक्रार देण्याबाबत सांगितल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. नवजात बालकांना मातांनी वेळोवेळी स्तनपान करीत राहावे. (केजीएन) मातांना मार्गदर्शन करण्याबाबत आशासेविकांसह वैद्यकीय यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहे. शेतीसाठी बियाणे मुबलक प्रमाणात असून शेतकऱ्यांनी स्वतःच्या मनाने पेरणी करू नका. हवामान खात्याचा अंदाज घेऊन पेरणी करा अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.तसेच शेतकऱ्यांना २४ तास मार्गदर्शनासाठी टोल फ्री सुरु करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीकरिता एरंडोल येथे १८ व जळगाव येथे २५ राउंड होणार आहेत. प्रत्येकी १४ टेबलांवर मतमोजणी होईल. (केजीएन) टेबलांजवळ अधिकारी, कर्मचारी व उमेदवारांचे एजंट यांना बसायला जागा राहील. यावेळी पोलीस दलातर्फे बंदोबस्त राहील, अशीही माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.