मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : कुऱ्हा – काकोडा येथील रहिवाशी मेंढपाळ नामदेव चोपडे, भरत मदने, भोजू मदने, ज्ञानेश्वर मदने यांचे मिळून जवळपास ९० ते १०० मेंढी उष्माघातामुळे थेरोळा शिवारात मृत्यूमुखी पडले. या ठिकाणी तहसीलदार, पशू वैद्यकीय अधिकारी यांची टीम, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी भेट दिली.
शासन व प्रशासन सर्वोतोपरी आपणा सोबत आहे. हवी ती मदत आम्ही आपणास करणार या शब्दात मेंढपाळ बांधवांना दिलासा शासकीय अधिकाऱ्यांनी दिला. यावेळी मेंढ्यांचे पंचनामे व पीएम करून घेतले.