जळगाव पोलीस दलातील २६ जणांना पोलीस पदके जाहीर; ९ अति उत्कृष्ट तर १४ जणांना उत्कृष्ट सेवा पदक
दीर्घकालीन निष्कलंक सेवेची दखल; कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षेसाठी बजावलेल्या कामगिरीचा बहुमान
जळगाव: जळगाव जिल्हा पोलीस दलात दीर्घकाळ प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि निष्कलंक सेवा बजावणाऱ्या २६ अधिकारी व अंमलदारांना १४ ऑगस्ट रोजी शासनाकडून विविध पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहेत. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, गुन्हेगारीवर कडक नियंत्रण मिळवणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्परतेने काम करणे, या निकषांवर या सर्व कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या पदकांमुळे पोलीस दलाची कार्यक्षमता, शिस्त आणि जनसेवेची बांधिलकी अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.


शासनाने जाहीर केलेल्या या पदकांमध्ये अति उत्कृष्ट सेवा पदकाचे ९, उत्कृष्ट सेवा पदकाचे १४, विशेष सेवा पदकाचे १ आणि पोलीस पदकाचे २, अशा एकूण २६ पदकांचा समावेश आहे. पदकप्राप्त अधिकारी व अंमलदारांमध्ये श्रीकांत धिवरे (उत्कृष्ट सेवा पदक), विजयकुमार ठाकूरवाड (अति उत्कृष्ट सेवा पदक), नितीन गणापुरे (अति उत्कृष्ट सेवा पदक), शशिकांत पाटील (विशेष सेवा पदक), दिनेश वडगुजर (पोलीस पदक), मुजफ्फरअली सय्यद (पोलीस पदक), श्रीकृष्ण पटवर्धन (अति उत्कृष्ट सेवा पदक), सुनील दामोरे (अति उत्कृष्ट सेवा पदक), प्रविणा जाधव (अति उत्कृष्ट सेवा पदक), सुनील माळी (अति उत्कृष्ट सेवा पदक), अनिल इंगळे (अति उत्कृष्ट सेवा पदक), प्रदिप पाटील (अति उत्कृष्ट सेवा पदक), जमीन अहमदखान (अति उत्कृष्ट सेवा पदक), जयंत चौधरी (अति उत्कृष्ट सेवा पदक), हरिष कोळी (उत्कृष्ट सेवा पदक), दिपक पाटील (उत्कृष्ट सेवा पदक), संदिप पाटील (उत्कृष्ट सेवा पदक), प्रविण वाघ (उत्कृष्ट सेवा पदक), विजय पाटील (उत्कृष्ट सेवा पदक), शरद पाटील (उत्कृष्ट सेवा पदक), संदिप सावळे (उत्कृष्ट सेवा पदक), महेश महाजन (उत्कृष्ट सेवा पदक), रज्जाकअली सय्यद (उत्कृष्ट सेवा पदक), भाऊसाहेब पाटील (उत्कृष्ट सेवा पदक), अतुल चौधरी (उत्कृष्ट सेवा पदक) आणि ईश्वर पाटील (उत्कृष्ट सेवा पदक) यांचा समावेश आहे. एकाच वेळी २६ पदके मिळणे हे जळगाव पोलीस दलाच्या उच्च दर्जाच्या शिस्तीचे प्रतीक मानले जात आहे.









