• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

तन्वीर ऊर्फ तन्या एमपीडीएअंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबद्ध

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 15, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तन्वीर ऊर्फ तन्या एमपीडीएअंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबद्ध

तन्वीर ऊर्फ तन्या एमपीडीएअंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबद्ध

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांची कारवाई

जळगाव : आगामी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तन्वीर ऊर्फ तन्या रहीम शेख (वय २१, रा. नुरानी मशीदजवळ, गेंदालाल मिल, जळगाव) याच्याविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले व औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती आदींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतच्या अधिनियमांतर्गत (एमपीडीए) स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

११ गंभीर गुन्ह्यांची नोंद

तन्वीर ऊर्फ तन्या शेख याच्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाचे ११ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये जबरी चोरीचे दोन, सरकारी नोकरावर हल्ला, दुखापत, दुखापतीसह दंगा, घरफोडी, आगळीक तसेच आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्ह्यांचा समावेश आहे.याशिवाय त्याच्याविरुद्ध विविध अदखलपात्र गुन्ह्यांचीही नोंद असून, २०२२ ते २०२६ या कालावधीत त्याच्यावर वारंवार प्रतिबंधक कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांच्या अहवालातून समोर आले आहे.

प्रतिबंधक कारवाईनंतरही गुन्हेगारी कायम

गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी त्याच्याविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून फायनल बॉण्ड घेण्यात आला होता. तसेच हद्दपारीची कारवाई करून त्याला तीन महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र, या कारवायांनंतरही त्याच्या वर्तनात अपेक्षित सुधारणा झाली नसून पुन्हा गुन्हे करण्याची प्रवृत्ती सुरूच राहिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

११ ऑगस्टला प्रस्ताव, १४ ऑगस्टला आदेश

तन्वीर शेख याला ‘धोकादायक व्यक्ती’ या संज्ञेत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी तयार करून ११ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडे सादर केला. प्रस्तावाचे अवलोकन करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला.
त्यानंतर १४ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दंडप्र/कावि/एमपीडीए/०४/२०२६ या आदेशान्वये तन्वीर शेख याला येरवडा, जिल्हा पुणे येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

पोलिस पथकाने घेतले ताब्यात
आदेशाची अंमलबजावणी करत जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, महिला पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस अंमलदारांच्या पथकाने तन्वीर शेख याला १४ ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही एमपीडीए कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि जळगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदारांनी प्रस्ताव तयार करण्यापासून ते कारवाईच्या अंमलबजावणीपर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.
जळगाव पोलिसांकडून आगामी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई अधिक तीव्र करण्यात येत असून, कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेतली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Previous Post

जळगाव पोलीस दलातील २६ जणांना पोलीस पदके जाहीर; ९ अति उत्कृष्ट तर १४ जणांना उत्कृष्ट सेवा पदक

Next Post

धक्कादायक! जुन्या भांडणातून १९ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धक्कादायक! जुन्या भांडणातून १९ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून  खून

धक्कादायक! जुन्या भांडणातून १९ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जुन्या भांडणातून १९ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून  खून
Uncategorized

धक्कादायक! जुन्या भांडणातून १९ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून

August 15, 2026
तन्वीर ऊर्फ तन्या एमपीडीएअंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबद्ध
1xbet russia

तन्वीर ऊर्फ तन्या एमपीडीएअंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 15, 2026
जळगाव पोलीस दलातील २६ जणांना पोलीस पदके जाहीर; ९ अति उत्कृष्ट तर १४ जणांना उत्कृष्ट सेवा पदक
1xbet russia

जळगाव पोलीस दलातील २६ जणांना पोलीस पदके जाहीर; ९ अति उत्कृष्ट तर १४ जणांना उत्कृष्ट सेवा पदक

August 15, 2026
जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक
1xbet russia

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

August 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धक्कादायक! जुन्या भांडणातून १९ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून  खून

धक्कादायक! जुन्या भांडणातून १९ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून

August 15, 2026
तन्वीर ऊर्फ तन्या एमपीडीएअंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबद्ध

तन्वीर ऊर्फ तन्या एमपीडीएअंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!