• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 22, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

जळगाव (प्रतिनिधी):- गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आणि आयक्यूएसी तसेच आयआयसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयसीआरईएसटी -२०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये एकूण  ९८ संशोधन पेपर सादर केले गेले.सदर परिषदेचे उद्घाटन गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. बेदात्री मौलिक (विद्युत विभाग, अमेटी युनिव्हर्सिटी नोएडा) होत्या. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. महेश एच पाटील (समन्वयक), डॉ. अतुल बर्‍हाटे (उपसमन्वयक) डॉ. तुषार कोळी (अधिष्ठाता), डॉ. हेमंत इंगळे (अधिष्ठाता, रिसर्च अँड डेव्हलपमेंट ) तसेच सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग आणि सहभागी संशोधक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले. आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सादर होणार्‍या संशोधन तसेच संशोधनासाठी उपस्थित असलेल्या तज्ञ मार्गदर्शक तसेच संशोधन व नाविन्यताबद्दल सद्यस्थितीतील सर्व प्रकारच्या शाखांच्या प्रणालीचा विकास तसेच संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांना ५जी व ६जी,  एज कॉम्प्युटिंग, जनरेटिव्ह  ए आय या क्षेत्रामध्ये खूप वाव आहे असे सांगितले. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी प्रत्येक वर्षी  रिसर्च चे आकडे हे निरंतर वाढत आहे हे कौतुकास्पद असून संशोधनाची वाढती वाटचाल राहील ही अपेक्षा व्यक्त केली. याचबरोबर विकसित भारताचे स्वप्नामध्ये योगदान गरजेचे असून आलेल्या संशोधकांना शुभेच्छा दिल्या. डॉ. बेदात्री मौलिक यांनी ड्रायव्हिंग पॅटर्न रिकग्निशन इन एनर्जी इफिशियंट ड्रायव्हिंग मध्ये त्यांनी करंट एनवोर्मेंटल इशूज बद्दल सांगताना पॉल्युशन आणि त्याचे इम्पॅक्ट तसेच कन्व्हेंशनल वाहने यांच्याशी निगडित असलेले प्रॉब्लेम्स याबद्दल सांगितलं. रोड सेफ्टी आणि सिक्युरिटी रिस्क बद्दल सांगताना रस्त्यावर होणारे विविध अपघात व त्या मागची कारणे सांगितले. तसेच एनर्जी कॅन्सम्प्शन बद्दल वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्टीकरण केले.ड्रायव्हिंग पॅटर्न बाय इंडिव्हिज्युअल स्टाइल, रोड ट्रॅफिक आणि एक्स्टर्नल कंडिशन्स, रियालायझेशन ऑफ इको ड्रायव्हिंग,  इम्पॉर्टन्स ऑफ अक्युरसी याबद्दल पूर्ण माहिती सांगितली.अशा विविध उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा विषय अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला.अभियांत्रिकीच्या विविध शाखांचे संशोधनकर्ते यांनी कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व बेसिक सायन्सेस या विषयांमध्ये आपले संशोधन ऑनलाइन पद्धतीने सादर केले.तज्ञ मार्गदर्शक म्हणून कॉम्प्युटर विषयासाठी डॉ. मनोज पाटील (संगणक विभाग प्रमुख एस एस बी टी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग बांभोरी), व डॉ. अभिजीत जाधव (सिम्बॉयसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पुणे), इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉमिनिकेशन डॉ. प्रशांत पाईकराव (शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती) व बेसिक सायन्सेस अँड ह्युमेनिटीज साठी डॉ. राजेंद्र खडायते (प्राचार्य, आर्ट,  कॉमर्स अँड सायन्स कॉलेज जामनेर),, मेकॅनिकल डॉ. कृष्णा श्रीवास्तव (एस एस बी टी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग बांभोरी)  व इलेक्ट्रिकल साठी डॉ. व्यंकटेश धोटे (विद्युत विभाग प्रमुख, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव)यांनी काम पाहीले. कॉम्प्युटर विभागात ४९, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन विभागात २२, मेकॅनिकल विभागात ११, इलेक्ट्रिकल विभागात ११ व बेसिक सायन्सेस विभागात ५ संशोधन पेपर सादर केले यातून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ट्रॅकमध्ये प्रियंका कासारे व डॉ. सरोज कुमार नंदा (अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी) यांच्या एनर्जी इफिशियंट सेक्युर क्लस्टरिंग अँड मल्टी चॅनेल लोकेशन इन वायरलेस सेन्सर नेटवर्क या विषयाला सन्मान मिळाला. तसेच जुही रामटेके व सहकार्‍यांचा मल्टी मॉडेल एआय बेस्ड आर्थरायटिस डिटेक्शन सिस्टीम (राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज, चंद्रपूर) हाही प्रबंध गौरविण्यात आला.इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ट्रॅकमध्ये अमृता बेदरकर व डॉ. नीता कुलकर्णी ( एस एस डब्ल्यु कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सोलापूर) यांच्या फ्लेक्झिबल मीमो अँटेना डिझाईन विषयावरील संशोधनाची निवड झाली.मेकॅनिकल इंजिनिअरिंग ट्रॅकमध्ये प्रतीक्षा वाघ (गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगाव) यांच्या एक्झॉस्ट गॅस वेस्ट हीट रिकव्हरी विषयावरील प्रबंधाला पुरस्कार मिळाला.इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ट्रॅकमध्ये मुजताहिद अन्सारी (एसएसबीटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बांभोरी) यांच्या फोटोव्होल्टिक सोलर सिस्टीममधील परफॉर्मन्स अ‍ॅनालिसिस या संशोधनाला सन्मान मिळाला.तर बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज ट्रॅकमध्ये आदित्य कानसे व डॉ. एस. जी. दाहोत्रे (फिजिक्स विभाग, दि बाटू लोणेरे) यांच्या लीड-फ्री मॅग्नेटो-इलेक्ट्रिक कंपोझिट्स विषयावरील प्रबंधाला पुरस्कार जाहीर करण्यात आला.या यशस्वी संशोधन कार्याबद्दल सर्व विजेत्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले. यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  आंतरराष्ट्रीय परिषदेचे समन्वयक महेश एच पाटील व उपसमन्वयक डॉ. अतुल बर्‍हाटे यांनी परिषदेचे नियोजन केले होते. परिषदेच्या सल्लागार समितीमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित संशोधकांचे मार्गदर्शन लाभले.सदर आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील (सचिव), डॉ. केतकी पाटील  (सदस्या), डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट), डॉ. अनिकेत पाटील  यांनी शुभेच्छा दिल्या व आयोजनाबद्दल कौतुक केले.सदर आंतरराष्ट्रीय परिषदेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. हर्षल पाटील (विद्युत विभाग) यांनी केले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

Next Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त
1xbet russia

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
1xbet russia

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

June 10, 2026
मध्य प्रदेशातील तिघांकडून १२ किलो गांजा जप्त
1xbet russia

दोन कोटींच्या अफू प्रकरणातील राजस्थानचा फरार आरोपी पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात

June 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon