जळगाव (प्रतिनिधी):- डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय गायन स्पर्धेत सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत विभागीय व राज्य स्तरावर मानाचे पुरस्कार पटकावले आहेत.
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे भावेश जाधव, ऋषभ भुते आणि स्वरूप काळेकर यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे आयोजित नाशिक विभागीय स्तरावर झालेल्या राज्यस्तरीय गायन स्पर्धेत सांस्कृतिक कार्यक्रमात महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला असून राज्यस्तरीय स्पंदन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून संस्थेचा गौरव वाढवला आहे. गायन, तबला आणि हार्मोनियम या तिन्ही क्षेत्रांत उत्कृष्ट सादरीकरण करत या विद्यार्थ्यांनी सर्वांगीण कौशल्याचे दर्शन घडवले. या यशात भावेश जाधव (गायक), ऋषभ भुते (तबला) आणि स्वरूप काळेकर (हार्मोनियम) यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून महत्त्वपूर्ण योगदान दिले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विजेत्यांचे सर्वत्र कौतुक होत असून महाविद्यालयाच्या वतीने संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील,सचिव डॉ. वर्षा पाटील, वैद्यकिय संचालक डॉ.एन एस आर्विकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांचेसह व्यवस्थापन सदस्यांनी मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.