चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील हिरापूर येथे २० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृत तरुणाचे नाव आसिफ मोहम्मद पठाण (वय २०, रा. हिरापूर, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसिफ पठाण याने अज्ञात कारणातून गळफास घेतला होता. त्यानंतर त्याला तातडीने चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मृताचा भाऊ निसार याकूब पठाण यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ४४/२०२६ अन्वये BNSS कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ तुकाराम चव्हाण करीत आहेत.









