• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव पोलिसांचा हातभट्ट्यांवर घणाघात; हजारो लिटर कच्चे रसायन नष्ट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 10, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव पोलिसांचा हातभट्ट्यांवर घणाघात; हजारो लिटर कच्चे रसायन नष्ट

जळगाव पोलिसांचा हातभट्ट्यांवर घणाघात; हजारो लिटर कच्चे रसायन नष्ट

जिल्हाभरात विविध ठिकाणी धडक कारवाई; हातभट्ट्या उद्ध्वस्त करून दारू निर्मितीचे साहित्य जाळले, अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले

जळगाव : जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीविरोधात जळगाव पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी अवैध हातभट्ट्यांवर धडक कारवाया करत हजारो लिटर कच्चे रसायन, दारू निर्मितीचे साहित्य आणि इतर साहित्य नष्ट केले. अनेक ठिकाणी हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्याने अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या पथकांची विविध ठिकाणी धडक

जिल्ह्यातील ग्रामीण तसेच दुर्गम भागात लपूनछपून सुरू असलेल्या हातभट्ट्यांची माहिती मिळाल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यांच्या पथकांनी कारवाई केली. या कारवाईत दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे मोठ्या प्रमाणातील कच्चे रसायन आणि साहित्य नष्ट करण्यात आले. काही ठिकाणी तयार दारूही जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.

हातभट्टी माफियांचे धाबे दणाणले

अवैध हातभट्टी दारूमुळे ग्रामीण भागात अनेक सामाजिक आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. अशा पार्श्वभूमीवर पोलिसांनी एकाच वेळी विविध भागांत कारवाईचा धडाका लावल्याने हातभट्टी चालक आणि विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांच्या या मोहिमेमुळे अवैध दारू व्यवसायाला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

पोलिसांची कारवाई; मग राज्य उत्पादन शुल्क विभाग कुठे?

दरम्यान, या कारवाईच्या निमित्ताने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अवैध दारू निर्मिती, हातभट्ट्या आणि दारू विक्रीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या स्थानिक यंत्रणेने जिल्ह्यात अशा किती हातभट्ट्यांवर कारवाई केली, किती गुन्हे दाखल केले आणि किती अवैध दारू व कच्चे रसायन जप्त केले, याची माहिती सार्वजनिक होणे गरजेचे आहे.

पोलिसांनाच का करावी लागते वारंवार कारवाई?

अवैध हातभट्ट्या पोलिसांच्या कारवाईत वारंवार उद्ध्वस्त होत असतील, तर संबंधित भागात उत्पादन शुल्क विभागाची गस्त आणि तपासणी यंत्रणा नेमकी किती प्रभावी आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर हातभट्टी उद्ध्वस्त होते; मात्र काही दिवसांनी पुन्हा त्याच परिसरात अवैध दारू निर्मिती सुरू होत असल्याच्या तक्रारी असतील, तर त्यावर कायमस्वरूपी नियंत्रण आणण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.

केवळ पोलिसांच्या कारवाईवर अवलंबून राहणार का?

अवैध दारू व्यवसायाविरोधातील लढा हा केवळ पोलिसांचा विषय न राहता पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या समन्वयातून व्यापक पद्धतीने राबविण्याची गरज आहे. हातभट्टी कुठे सुरू आहे, त्यासाठी कच्चा माल कोण पुरवितो, तयार दारू कुठे आणि कोणामार्फत विकली जाते, या संपूर्ण साखळीवर कारवाई झाली तरच हा व्यवसाय मुळापासून थांबू शकतो.

नागरिकांची अपेक्षा : पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेप्रमाणेच राज्य उत्पादन शुल्क विभागानेही जिल्हाभरात विशेष मोहीम राबवून अवैध हातभट्ट्या, दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच आतापर्यंत केलेल्या कारवाईचा लेखाजोखा आणि पुढील नियोजन जनतेसमोर मांडावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


 

 

Previous Post

इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी निघालेला तरुण रेल्वे अपघातात ठार

Next Post

अमळनेर तालुक्यातील जानवे येथे ६६ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |

अमळनेर तालुक्यातील जानवे येथे ६६ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

अमळनेरात पिकअपमधून ३ बैलांची निर्दयतेने अवैध वाहतूक

August 10, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
Uncategorized

मुलगी पळवून नेण्यास मदत केल्याच्या संशयावरून तरुणावर कड्याने हल्ला

August 10, 2026
चौगाव येथील बेपत्ता तरुणाचा पाझर तलावात बुडून मृत्यू
Uncategorized

विहिरीवर पाणी काढताना पाय घसरून पडल्याने २२ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पिंपळगाव हरेश्वर पोलिसांत नोंद

August 10, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

तांबोळे येथे पत्नीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने ७३ वर्षीय वृद्धाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

August 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

अमळनेरात पिकअपमधून ३ बैलांची निर्दयतेने अवैध वाहतूक

August 10, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

मुलगी पळवून नेण्यास मदत केल्याच्या संशयावरून तरुणावर कड्याने हल्ला

August 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon