जळगाव ( प्रतिनिधी ) – दुरुस्तीला टाकलेल्या मोबाईलची चौकशी करण्यासाठी दुकानात गेलेल्या ग्राहकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावरील अमर रगडा दुकानाच्या परिसरातून चोरून नेली.
या दुचाकीचे मालक चंद्रकांत कासार ( रा – स्वामी समर्थ केंद्राजवळ , तुकारामवाडी ) यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , ते शनिवारी सायंकाळी ७ वाजता गोलाणी मार्केटमध्ये दुरुस्तीला टाकलेल्या मोबाईलची चौकशी करण्यासाठी दुकानात गेले होते . मोबाईल दुरुस्त झालेला नसल्याने परत आले तेंव्हा त्यांनी अमर रगड दुकानाजवळच्या कचराकुंडीजवळ लावलेली हिरो होंडा कंपनीची मोटसायकल ( क्र -एम एच- १९ – सी एच ७२२९) गायब झालेली आढळली शोध घेऊनही मोटरसायकल न सापडल्याने त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांचीरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.