जळगाव ( प्रतिनिधी ) – घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात कपाटात ठेवलेली मशिदीच्या वर्गणीची ५ हजार रुपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना आज उघडकीस आली.
गेंदालाल मिल भागातील रहिवाशी आणि पेंटिंगचा व्यवसाय करणारे शेख रफिक शेख रशीद यांची बाजूच्याच गल्ली मध्ये राहणारी आई आजारी असल्याने ते काल रात्री आईला दवाखान्यात घेऊन गेले होते , त्यांची बहीणही त्याच भागात राहते आईला घेऊन दवाखान्यातून परत येत असताना त्यांच्या बहिणीने त्यांना फोन करून मी बाहेरगावी असल्याने आजची रात्र तुम्ही सगळे माझ्या घरीच झोप असे सांगितले होते त्यामुळे ते आपल्या घराला कुलूप लावून बहिणीच्या घरी झोपायला गेले होते रात्री चोरट्यांनी संधी साधून त्यांच्या गेंदालाल मिल भागातील घराचे कुलूप तोडून ही चोरी केली त्यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.