जळगाव ( प्रतिनिधी ) – खंडेरावनगर भागातील आझाद नगरातील प्रकाश किराणा दुकानाजवळ मुलीची छेड काढल्याच्या वादातून शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास दोन गटात हाणामारी झाली होती परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलीसांच्या पथकावरही दगडफेक करण्यात आली होती. रामानंदनगर पोलीस ठाण्यात रात्री उशीरा २९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
आझाद नगरात शनिवारी बाजार भरतो . २ आठवड्यांपूर्वी बाजारात आलेल्या एका मुलीची छेड काढल्याचा प्रकार घडला होता त्या रागातून मुलीच्या कुटुंबातील काही लोक व त्यांच्या साथीदारांनी शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास एकाला मारहाण केली होती. या मुलीच्या गटातील एकाने आझाद नगरातील प्रकाश किराणा दुकानाजवळ जाब विचारल्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारी व दगडफेकीत झाले. या हाणामारीची माहिती मिळाल्यावर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पो. नि. विजय शिंदे यांच्या पथकातील पोहेकॉ संजय सपकाळे, पो.ना. सुशिल चौधरी, पो.ना. प्रविण जगदाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलीस कर्मचारी परिस्थितीची माहिती घेत असतांना दानिश पिंजारी याने पोलीसांना शिवीगाळ केली. जमावातील नागरीकांनी रस्त्यावरील विटा व दगड उचलून पोलिसांवरही दगडफेक केली होती. या दगडफेकीत दोन पोलीस कर्मचाऱ्यांना दुखापत झाली आणि दोन घरांचेही नुकसान झाले. रामानंद नगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तातडीने घटनास्थळी पोलीसांची कुमक बोलविण्यात आली. नंतर आलेल्या या पोलिसांच्या पथकाने जमाव पांगविला. आता या भागात तणावपुर्ण शांतता आहे.
पोहेकॉ संजय सपकाळे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी दानिश पिंजारी, अशपाक खान, रमजान पिंजारी, रेहान शेख, समीर शेख सलीम, अज्जू चावल, अक्तर फरीक , मोहमंद पिंजारी, अक्तर पिंजारी, समितर पटवे, संजय धनगर, सागर भोई, सनी उर्फ खंडू उमप, राकेश भोई, विक्की भोई, विक्की भोई, नाना भोई, यशवंत भोई, बारकू भोई, समाधान भोई, मुश्ताक पिंजारी, इम्रान पिंजारी, गंभीर पिंजारी, अनिल पिंजारी, शाहीद पिंजारी, शाहरूख पिंजारी, आवेश पिंजारी, लखन भोई , बारकू उर्फ राम भोई आणि सादीक मुनाफ या २९ जणांवर रात्री उशीरा रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाण झालेल्या बारकू भोई ( रा – खंडेराव नगर ) यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणारे दानिश पिंजारी , समीर सलीम , रेहान शेख ( रा . पिंप्राळा ) , अज्जू चावला ( खंडेराव नगर ), रमजान पिंजारी , अश्फाक खान ( खंडेराव नगर ) आणि अन्य ५ अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . रात्री घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली होती.