• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडून बदनामी करणाऱ्या जळगावच्या तरुणाविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 25, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडून बदनामी करणाऱ्या जळगावच्या तरुणाविरुद्ध गुन्हा

भुसावळ ( प्रतिनिधी):- लग्न आणि शारीरिक संबंधांची मागणी फेटाळल्याचा राग मनात धरून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत, सोशल मीडियावर तिची बदनामी केल्याची धक्कादायक घटना भुसावळ शहरात उघडकीस आली आहे. संशयित आरोपीने पीडितेच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार करून तिचे फोटो पोस्ट केले, तसेच कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात जळगाव येथील एका २२ वर्षीय तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी (वय १७ वर्षे १० महिने, रा. भुसावळ) आणि संशयित आरोपी सागर पाटील (वय २२, रा. कुसुंबा, ता. जळगाव) यांची जानेवारी २०२३ पासून ओळख होती. या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले. दरम्यान, जानेवारी २०२५ मध्ये संशयित आरोपी सागर याने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिच्याकडे लग्नाची आणि शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. मात्र, पीडितेने या गोष्टीला स्पष्ट नकार दिला. या नकाराचा राग आल्यामुळे आरोपीने जानेवारी २०२५ पासून ते आजतागायत पीडितेचा मानसिक छळ सुरू केला. ती भुसावळ येथील आपल्या घरी असताना, तसेच क्लासमध्ये जात-येत असताना आरोपीने तिचा सातत्याने पाठलाग केला आणि तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

या छळवणुकीची परिसीमा गाठत संशयित आरोपी सागर पाटील याने सोशल मीडियाचा गैरवापर केला. त्याने पीडित मुलीच्या नावाचा वापर करून इन्स्टाग्रामवर एक बनावट अकाउंट ओपन केले. या बनावट अकाउंटवर त्याने पीडितेच्या परवानगीशिवाय स्वतःचे आणि तिचे एकत्रित फोटो पोस्ट करून तिची सामाजिक बदनामी केली. एवढ्यावरच न थांबता त्याने पीडित मुलीच्या कुटुंबीयांचे बरेवाईट करण्याची (जीवे मारण्याची) धमकी देखील दिली. या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून २४ मे २०२६ रोजी रात्री १ वाजून ३७ मिनिटांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ११५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ७८, ३५१(२) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ (पोक्सो) चे कलम ११ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे करत आहेत.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती

Next Post

चोपड्यात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

चोपड्यात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

यावल बसस्थानकात प्रवाशाची पर्स लांबविली

May 25, 2026
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

चोपड्यात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

May 25, 2026
इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडून बदनामी करणाऱ्या जळगावच्या तरुणाविरुद्ध गुन्हा
1xbet russia

इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडून बदनामी करणाऱ्या जळगावच्या तरुणाविरुद्ध गुन्हा

May 25, 2026
वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती
1xbet russia

वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती

May 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

यावल बसस्थानकात प्रवाशाची पर्स लांबविली

May 25, 2026
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

चोपड्यात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

May 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon