अमरावती ( प्रतिनिधी ) – दिल्लीत बेस्ट क्रेएटिव्ह पर्सनॅलिटी २०२१ व भारत गौरव पुरस्कार सन्मानित दिग्दर्शक सागर भोगे आणि केबीसी मराठी विनर रोहन वासनिक यांचा आज सत्कार करण्यात आला.
सागर भोगे यांचे आई वडील यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला . यावेळी माजी महापौर विलास इंगोले , लहुजी शक्ती सना विदर्भ अध्यक्ष डॉ. रुपेश खडसे, स्वराज्य संघटनेचे प्रवीण बनसोड, लहुजी शक्ती सेना जिल्हा अध्यक्ष पंकज जाधव, शिवसेना नेत्या प्रतिभा बोपशेट्टी, भाजपच्या सांस्कृतिक सेल अध्यक्ष सुषमा कोठेकर, स्वराज्य संघटना जिल्हाध्यक्ष प्रवीण खंडारे, लहुजी शक्ती सेना शहर अध्यक्ष गौरव गवळी, ह. भ. प. साहदेव महाराज थोरात, विदर्भ लहुजी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष आकाश खडसे, कलाजागर न्युजच्या उपसंपादक ललिता वानखडे हे पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
सूत्रसंचालक आशा मेश्राम, विशाल वानखडे, मोहन स्वगे, नितेश कथे, राजेश भोगे, गोपाल इंगळे, रंजित वानखडे, आशिष सुंदरकर, अमोल कोयकार, भूषण जोंधळे, सुनील वानखडे, उमेश कलाने, उमेश डोगरे आदी यावेळी उपस्थित होते.