• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 27, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

विजेते नाजनीन शेख, तनुष्का चौधरी, देवांशी चौधरी गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेचे विजेते

जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगाव यांच्या वतीने आयोजित ‘गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा’ उत्साहात संपन्न झाली. यंदा या स्पर्धेचे २९ वे वर्ष होते. विविध वयोगटांतील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, प्राचार्या पद्मजा नेवे, परीक्षक देवेंद्र देशमुख (अकोला) तसेच खिरोदा येथील श्रीमती कल्पना गावंडे उपस्थित होत्या.
विविध वयोगटांतील हौशी गायक-गायिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या स्पर्धेत बाल गट, किशोर गट आणि प्रौढ गट अशा तीन गटांत स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पारितोषिक, गोदावरी करंडक व प्रमाणपत्र, तर उत्तेजनार्थ विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले.
प्रौढ गटासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे २००१, १५०१ व १००१ रुपये, किशोर गटासाठी १५०१, १००१ व ७०१ रुपये, तर बाल गटासाठी १००१, ७०१ व ५०१ रुपये अशी पारितोषिके देण्यात आली.
समारोपप्रसंगी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. सुहास बोरसे, प्राचार्या पद्मजा नेवे, अॅड. डॉ. महिमा मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेला प्रा. सुशील महाजन व प्रा. प्रवीण महाजन यांनी साथसंगत केली. स्पर्धेचे प्रास्तावीक डॉ. महिमा मिश्रा तर सुत्रसंचालन सौ. राजश्री पाठक यांनी केले मार्गदर्शन करतांना डॉ. उल्हास पाटील यांनी संगीत ही केवळ कला नसून मनाला समृद्ध करणारी आणि समाजाला जोडणारी शक्ती आहे भावगीतांच्या माध्यमातून मराठी संगीताची समृद्ध परंपरा आणि भावविश्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेतून होत आहे. या स्पर्धेचे २९ वे वर्ष हे तिच्या सातत्यपूर्ण वाटचालीचे द्योतक आहे. गोदावरी संगीत महाविद्यालयाने भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देत राहील असे मनोगत डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केले. तर परिक्षकांनी गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांनी उत्तम तयारी करून भावगीते सादर केली. प्रत्येक गायक-गायिकेने गीतातील भाव, शब्दोच्चार स्वरांची अचूकता, ताल आणि सादरीकरण यांचा चांगला समन्वय साधण्याचा प्रयत्न केला नवोदित कलाकारांमध्ये असलेली गुणवत्ता आणि संगीताविषयीची आवड निश्चितच कौतुकास्पद आहे. अशा स्पर्धांमुळे कलाकारांना आपले कौशल्य तपासण्याची आणि त्यात सुधारणा करण्याची संधी मिळते निकाल हा स्पर्धेचा एक भाग असला तरी सातत्याने संगीताचा रियाज करणे आणि कलेची साधना करणे हेच कलाकारांच्या यशाचे खरे गमक आहे. मनोगत व्यक्त केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संगीत महाविद्यालयाचे केंद्र व्यवस्थापक श्री राजु पाटील प्रा. देवेंद्र गुरव, प्रा. भुषण खैरनार, श्री. किशोर चौधरी, श्री. अनंता साठे, भूषण चौधरी यांच्यासह प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
स्पर्धेतील विजेते व गीताचे बोल
बाल गट –
प्रथम – देवांशी जितेंद्र चौधरी (केव्हा तरी पहाटे)
व्दितीय भैरवी दिपक ठाकुर (फुलले रे क्षण माझे)
तृतीय – कार्तिक संदिप ठाकुर (तुझे गीत गाण्यासाठी)
उत्तेजनार्थ चारुल राजेंद्र वाघ (मी वाऱ्याच्या वेगाने)
किशोर गट –
प्रथम – तनुष्का अनंत चौधरी (मी फुले ही वेचतांना)
व्दितीय श्रावणी सचिन देशपांडे (माझ्या सुरात माझा)
तृतीय – दिव्या सुदाम शिवरामे (सर्वस्वी तुजला वाहुनी)
उत्तेजनार्थ – स्वरा विनायक विलायते (मी मज हरपुन बसले)
प्रौढ गट –
प्रथम – नाजनीन शेख (जिवलगा राहीले रे दुर)
व्दितीय प्रणव विनोद ईखे (तुला पाहीले मी नदीच्या किनारी) तृतीय – समिक्षा लक्ष्मीकात माकोडे (रसिका मी कैसे गाऊ गीत)
उत्तेजनार्थ निकिता गणेश जोशी (जिवलगा कधी रे येशील तु)


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Next Post

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon