• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बोकड काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 27, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बोकड काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

पहूर रस्त्यावरील हिवरी फाट्याजवळील घटना . ; एक आरोपी अटकेत, दोघे फरार

पहूर (प्रतिनिधी) :- गावातील बोकडे काढून घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तिघांनी तरुणासह त्याच्या वडिलांवर चापटाबुक्क्यांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना २६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजता वाकोट ते पहूर रस्त्यावरील हिवरी फाट्याजवळ घडली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वर उत्तम मोरे (वय ४५, रा. कुंभारखेडा, ता. जामनेर, जि. जळगाव) यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर दोन आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

या प्रकरणी मयत ज्ञानेश्वर मोरे यांचा मुलगा यश ज्ञानेश्वर मोरे (वय १९, रा. कुंभारखेडा, ता. जामनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५०/२०२६, भारतीय न्याय संहितेतील कलम १०३(२), १०९(२), ३५१(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यश मोरे यांच्या घरासमोर असलेले बोकडे काढून घेण्याबाबत त्यांनी गावातील सरपंच यांच्याकडे विनंती केली होती. त्यानुसार बोकडे काढण्याचे काम सुरू असताना बाळू उत्तम जोशी, शांताराम उत्तम जोशी आणि अजय त्र्यंबक जोशी, तिघेही रा. कुंभारखेडा, ता. जामनेर, यांनी यश मोरे यांच्यासोबत शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यावेळी यश यांनी शिवीगाळ करू नका, असे सांगितले असता तिघांनी त्यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

या घटनेनंतर यश मोरे हे त्यांचे वडील ज्ञानेश्वर मोरे यांच्यासोबत दुचाकी क्रमांक MH-19-BT-2308 वरून पहूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात होते. त्यावेळी वाकोद ते पहूर रस्त्यावरील हिवरी फाट्याजवळ संबंधित आरोपींनी त्यांचा पाठलाग केला. आरोपींनी त्यांच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची आय-१० कार क्रमांक MH-19-EA-9769 ही दुचाकीच्या पाठीमागून आणून धडक दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या धडकेत यश व त्यांचे वडील ज्ञानेश्वर हे दोघेही रस्त्यावर पडले. त्यानंतर तिघांनी ज्ञानेश्वर मोरे यांच्या छातीवर, पोटावर तसेच तोंडावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या मारहाणीत ज्ञानेश्वर मोरे यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले असून, पहूर पोलिसांनी प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी क्रमांक १ बाळू उत्तम जोशी याला पोलिसांनी २६ सप्टेंबर रोजी रात्री ११.२६ वाजता अटक केली आहे. तर आरोपी क्रमांक २ शांताराम उत्तम जोशी आणि आरोपी क्रमांक ३ अजय त्र्यंबक जोशी हे दोघे फरार असून, त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे, पहूर पोलिस ठाणे, करीत आहेत.


 

 

Tags: #pahur crime news #jalgaon #maharahtra #bharat
Previous Post

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोकड काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बोकड काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026
मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..
जैन कंपनी

मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

September 27, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव

September 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोकड काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

बोकड काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon