जळगाव, ( प्रतिनिधी ) – गोदावरी आय. एम. आर. महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेला पाच दिवसीय नॅशनल प्राध्यापक विकास कार्यक्रम (एफडीपी) उत्साहात संपन्न झाला. प्रगत संशोधन पद्धती, नैतिकता आणि प्रकाशन व निधीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर आधारित ही कार्यशाळा ११ ते १५ मे दरम्यान आयोजित करण्यात आली होती. आज कार्यशाळेचा समारोप करण्यात आला.
या कार्यशाळेस देशभरातून तब्बल १३४२ शिक्षक व संशोधकांनी सहभाग नोंदविला.उच्च शिक्षण क्षेत्रातील संशोधन कौशल्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात संशोधनातील आधुनिक तंत्रज्ञान, नैतिकता, शैक्षणिक लेखन आणि संशोधन निधीसाठी प्रस्ताव लेखन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.डॉ. ज्ञानेश्वर किरंगे यांनी डिजिटल युगातील संशोधन नैतिकता आणि सचोटीवर मार्गदर्शन करताना डिजिटल युगातील संशोधनात नैतिक मूल्यांचे पालन, डेटा गोपनीयता आणि साहित्य चौर्य टाळण्याचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. संदीप पाटील यांनी डिजिटल संशोधन साधने आणि सर्वेक्षणे या सत्रात ऑनलाइन सर्वेक्षण साधने व डिजिटल डेटा संकलन पद्धतींबाबत माहिती दिली.डॉ. नीता पाटील यांनी एआय साधनाचा वापर करून साहीत्य आढावा या विषयावर कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साधनांच्या मदतीने साहित्य समीक्षा अधिक परिणामकारक कशी करता येते याचे प्रात्यक्षिक सादर केले. तर डॉ. प्रियंका बर्हाटे यांनी शैक्षणिक लेखन आणि उच्च-प्रभावशाली नियतकालिकांमध्ये प्रकाशन या विषयावर संशोधन लेखन व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. डॉ. हेमंत इंगळे यांनी संशोधन निधीसाठी प्रभावी प्रस्ताव लेखनाबाबत माहिती दिली.या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. उल्हास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. प्रशांत वारके, प्रा. चारुशीला चौधरी तसेच आयोजन समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमातील सर्व सहभागींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असून, या कार्यशाळेमुळे शिक्षक व संशोधकांना आधुनिक संशोधन पद्धतींबाबत नवे ज्ञान मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.