• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 17, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा उपक्रम

जळगाव, ( प्रतिनिधी ) – गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, जळगाव येथे १४ ते १५ मे २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेला गोदावरी हॅकॅथॉन १.० हा राष्ट्रीय स्तरावरील हॅकॅथॉन महाउत्साह दिमाखात संपन्न झाला. इनोव्हेशन टू इम्पॅक्ट या संकल्पनेवर आधारित २४ तासांच्या अखंड कोडिंग स्पर्धेत देशभरातील तरुण अभियंत्यांनी सहभाग घेत नाविन्यपूर्ण तांत्रिक उपाय सादर करत नवकल्पनांचा महाउत्सव साकारला.
प्रमुख पाहुणे म्हणून अमित लढ्ढा (लढ्ढा मॅथेमॅटिकल अकॅडमी), डॉ. नवीन खंदारे (सीईओ, केबीसीएनएमयू सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस – केसीसीआयएल) तसेच श्री सागर पाटील (डायरेक्टर, काईट फोरम),महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी, कार्यक्रम समन्वयक डॉ. अनिलकुमार विश्वकर्मा, डॉ. हेमंत इंगळे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. प्रस्तावना डॉ. अनिलकुमार विश्वकर्मा यांनी केली. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी गोदावरी हॅकॅथॉन १.० मागील उद्देश  जळगावसारख्या भागात नवकल्पना, संशोधन आणि स्टार्टअप संस्कृती विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. सागर पाटील यांनी काईट फोरममार्फत स्टार्टअप्सना मिळणार्‍या टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, मेंटॉरशिप आणि विविध सहाय्य योजनांची माहिती दिली. डॉ. नवीन खंदारे यांनी केसीसीआयएलच्या माध्यमातून १६५ हून अधिक स्टार्टअप्सना सहाय्य केल्याची माहिती देत विद्यार्थ्यांना स्टार्टअप उभारणीसंदर्भात मार्गदर्शन केले.या हॅकॅथॉनसाठी १०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. निवड प्रक्रियेनंतर १० संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आणि एकूण ३९ विद्यार्थ्यांनी २४ तासांच्या स्पर्धेत सहभाग घेतला.स्पर्धेत स्मार्ट सिटी, हेल्थकेअर, कृषी आणि शिक्षण क्षेत्रातील प्रत्यक्ष जीवनातील समस्यांवर आधारित उपाय विकसित करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांनी व्हॉट्सप आधारित नागरिक तक्रार निवारण प्रणाली, १०८ म्ब्युलन्स सेवेसाठी जलद रूटिंग अल्गोरिदम, शेतकर्‍यांसाठी डिजिटल मार्केटप्लेस तसेच ग्रामीण शिक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रणाली यांसारख्या अभिनव प्रकल्पांवर काम केले.या हॅकॅथॉनमुळे विद्यार्थ्यांना २४ तासांचा इंटेन्स कोडिंग अनुभव, इंडस्ट्री मेंटॉरशिप, प्रत्यक्ष समस्यांवर काम करण्याची संधी आणि तज्ज्ञ परीक्षकांसमोर सादरीकरण करण्याचा अनुभव मिळाला.
 स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे ठरले :
प्रथम क्रमांक – अथर्व चौरसिया, दामिनी देशमुख, भावेश पाटील, अनन्या जाधव यांची टीम एथर लॅब (जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगाव),द्वितीय गौरव पाटील, सानिका कासार, भूषण घोडके, केतन पाटील कोड स्टॉर्म (गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव),तृतीय आदिती कदम, आर्या नाटे, वंश पांडे, अंशुल नागपुर  अँग्री मित्र (व्हीआयटी, पुणे) विजेत्या संघांना अनुक्रमे १५,०००, १०,००० आणि ५,००० अशी रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली.समारोपप्रसंगी परीक्षक व पर्यवेक्षक अजिंक्य तोतला तसेच आशुतोष रंगा उपस्थित होते. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना, टीमवर्क आणि तांत्रिक कौशल्याचे विशेष कौतुक केले.इनोव्हेट, बिल्ड, इम्पॅक्ट या संदेशासह आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या तांत्रिक क्षमतांना वाव देणारा, स्टार्टअप संस्कृतीला चालना देणारा आणि नवभारत घडवणार्‍या युवा शक्तीचा प्रेरणादायी उत्सव ठरला.यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील तसेच डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डिंकी शदानी, सानिका कासार, हर्षा धांडे व तरन्नुम पिंजारी या विद्यार्थिनींनी उत्कृष्टरीत्या केले.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू

Next Post

गोदावरी आय. एम. आर.मध्ये पाच दिवसीय राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

गोदावरी आय. एम. आर.मध्ये पाच दिवसीय राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  
1xbet russia

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  

June 11, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon