डॉ. उल्हास पाटील कृषी अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालयाचा उपक्रम
जळगाव: कृषी क्षेत्रातच आधुनिक कृषी अन्न व तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळवून उज्ज्वल करिअर घडवू इच्छिणार्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील कृषी अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालय, जळगाव येथे कृषी अन्न व तंत्रज्ञान या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. महाविद्यालयाचा सांकेतिक क्रमांक १६३८२ आहे.कॅप फेर्यांचे वेळापत्रक: दुसरी फेरी प्राधान्यक्रम (ऑप्शन फॉर्म) नोंदवण्यासाठी २० व २१ ऑगस्ट तिसरी फेरी प्राधान्यक्रम (ऑप्शन फॉम) नोंदवण्यासाठी २७ व २८ ऑगस्टविद्यार्थ्यांनी प्रवेशाची संधी न गमावता जास्तीत जास्त प्राधान्यक्रम नोंदवून आपले पसंतीचे महाविद्यालय निश्चित करावे, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यासाठी महाविद्यालयाने मार्गदर्शनाची सुविधा देखिल उपलब्ध करून दिली आहेत. विद्यार्थ्यांनी दिलेल्या तारखांनुसार आपले प्राधान्यक्रम नोंदवून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक चोैधरी यांनी केले आहे.संपर्क:डॉ. अशोक चोैधरीे (प्राचार्य): ९४०३२४९६४० मोहन सुर्यवंशी (अॅडमिशन इंचार्ज):९५०३२६९४५४ यावर संपर्क करावा











