• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 5, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

निमखेडी शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर अपघात; धडक देऊन अज्ञात चालक वाहनासह फरार

जळगाव (प्रतिनिधी) — जळगाव शहरातील निमखेडी शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ४२ वर्षीय शेतकरी समाधान भगवान कोळी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान भगवान कोळी (वय ४२), रा. प्लॉट क्रमांक १६, गट क्रमांक ७६६, शिवधाम मंदिराजवळ, निमखेडी शिवार, जळगाव हे १ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास काम आटोपून घरी परत जात होते.

निमखेडी शिवारातील साई पॅलेस हॉटेलजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरून जात असताना अज्ञात वाहनावरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन भरधाव वेगाने चालविले. यावेळी त्याने समाधान कोळी यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

गंभीर जखमी अवस्थेत समाधान कोळी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती न देता अज्ञात वाहनचालकाने वाहनासह घटनास्थळावरून पलायन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२.३० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन अधिनियमातील कलम १३४(ब), १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे करीत आहेत. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा आणि चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Tags: #jalgontaluka police stetion #maharashtra
Previous Post

जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
क्राईम

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

October 5, 2026
जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास
क्राईम

जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

October 5, 2026
यावल तालुक्यात दिव्यांग व्यक्तीला विहिरीत उलटे लटकवून मारहाण; दोघे अटकेत
क्राईम

यावल तालुक्यात दिव्यांग व्यक्तीला विहिरीत उलटे लटकवून मारहाण; दोघे अटकेत

October 5, 2026
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रदेश तेली समाजातर्फे सन्मान
खान्देश

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रदेश तेली समाजातर्फे सन्मान

October 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

October 5, 2026
जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

October 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!