यावल तालुक्यातील मनवेल येथील घटना
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील मनवेल येथील माणकेश्वर महादेव मंदिरात लावण्यात आलेली ११ किलो वजनाची घंटा चोरीस गेली असून अज्ञात चोरट्याविरुध्द यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनवेल येथे माणकेश्वर महादेव मंदिर असून लोकसहभागातून या मंदिराचे बाधकाम करण्यात येत आहे. त्याचे काम सुरु आहे. या ठिकाणी ११ किलो वजन असलेला पितळी घंटा आहे. हा घंटा दि.७ च्या मध्यरात्री चोरांनी कापुन नेल्याचा प्रकार सकाळी दर्शनासाठी जाणाऱ्या भावीकांच्या निर्देशनात आला.यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.