भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील दिपनगर औष्णिक विद्यूत केंद्रातील लोखंडी टॉवरजवळ ठेवण्यात आलेल्या लोखंडी साहित्याची चोरी झाल्याची घटना शनिवारी दि. ६ जुलै रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथील औष्णिक विद्यूत केंद्रातील २१० मेगा वॅट प्रकल्पातील लोखंडी टॉवर जवळ काही लोखंडी साहित्य ठेवण्यात आले होते. शनिवारी ६ जुलै रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास यातील ७ हजार ५०० रूपये किंमतीच्या लोखंडी प्लेटा चोरी करतांना नशिरशहा जनाब शहा, पवन (पुर्ण नाव माहित नाही) आणि एक अनोळखी असे तीन जण आढळून आले. यावेळी चोरी करत असल्याचे सुरक्षा रक्षक कुणाल लहू वाघोदे रा. भुसावळ यांच्या लक्षात आले.
त्यावेळी तिघांनी लोखंडी प्लेटा जागेवरच सोडून पसार झाले. ही घटना घडल्यानंतर कुणाल वाघोदे यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पहाटे ५ वाजता नशिरशहा जनाब शहा, यासह पवन (पुर्ण नाव माहित नाही) आणि एक अनोळखी तिघे रा. फेकरी ता. भुसावळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ योगेश पालवे हे करीत आहे.