• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रशियन कंपनीत गुंतवणुकीचे आमिष; वकिलाची ७ लाख ६० हजारांची फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 20, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

रशियन कंपनीत गुंतवणुकीचे आमिष; वकिलाची ७ लाख ६० हजारांची फसवणूक

जळगाव | प्रतिनिधी

रशियन कंपनीने भारतात काही भाग विक्री केल्याचे सांगून त्यामध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत जळगावातील एका वकिलाची ७ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुण्यातील दोघांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद निमानाथ सोनार (रा. कात्रज, पुणे) आणि आनंद परदेशी (रा. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी विसनजी नगरातील अॅड. विजय बाबुलाल दाणेज (वय ५७) यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही फसवणूक ६ जून २०१६ ते २८ मार्च २०२० या कालावधीत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

रशियन कंपनीच्या नावाने गुंतवणुकीचे आमिष

अॅड. दाणेज यांचा जळगावातील एक मित्र पुण्यातील विनोद सोनार याला त्यांच्याकडे घेऊन गेला होता. सोनार याने २०१६ मध्ये भारतात एका रशियन कंपनीने काही भाग विक्री केल्याचे सांगितले. सदर कंपनी ऑईल कंपनीच्या नावाने असून त्यासाठी १५ भागीदार नियुक्त करण्यात आल्याची माहिती त्याने दिली.

कंपनीचे करारनामे, नवनियुक्त संचालकांची ओळखपत्रे तसेच रशियन कंपनीसोबत झालेल्या कथित जागतिक कराराच्या बातम्या दाखवून सोनार याने दाणेज यांचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे. याशिवाय कंपनीचे कामकाज पाहण्यासाठी पुण्यातील आनंद परदेशी यांची नियुक्ती केल्याचेही सांगण्यात आले.

डॉलर-युरो ट्रेडिंगमधून मोठ्या नफ्याचे आश्वासन

कंपनीचे भागीदार भारतातून निधी जमा करून डॉलर आणि युरोमध्ये ट्रेडिंग करणार असून गुंतवणूकदारांना मोठा नफा देणार असल्याचे सांगण्यात आले. गुंतवणुकीवर दरमहा ७२ ते ३६० टक्क्यांपर्यंत नफा, तसेच १० टक्के रेफरल कमिशन आणि १० टक्के बायनरी कमिशन देण्याचे आमिष दाखवण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

यानंतर आनंद परदेशी याच्याशी संपर्क करून देण्यात आला. दाणेज तसेच त्यांच्या पत्नीच्या नावाने खाते सुरू करण्यात आल्याचेही पोलिस तक्रारीत नमूद आहे.

बिटकॉईन खरेदीच्या नावाने ७ लाख १० हजार पाठवले

५ जानेवारी २०१८ रोजी बिटकॉईन खरेदी करण्यास सांगितल्यानंतर अॅड. दाणेज यांनी ७ लाख १० हजार रुपये पाठविले. ही रक्कम आनंद परदेशी याच्या खात्यावर पाठविण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर दाणेज यांना तीन वेळा एकूण ३७२ डॉलर कमिशन मिळाले.

मात्र, त्यानंतर खात्यावर अभासी स्वरूपात नफा दिसत असला तरी प्रत्यक्ष रक्कम काढता येत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

पैसे मागितल्यावर धमकी दिल्याचा आरोप

गुंतवलेली रक्कम व कमिशन मिळण्यासाठी दाणेज यांनी वारंवार पाठपुरावा केला. त्यावेळी त्यांना जीवे मारण्याची तसेच ‘एन्काऊंटर’ करण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

दाणेज यांनी आनंद परदेशी याला फेसबुक मेसेंजरवर कायदेशीर नोटीस पाठविल्यानंतर त्याने फेसबुक खाते तसेच दाणेज यांचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर संबंधित कंपनीची वेबसाईटही गुगलवरून हटविण्यात आल्याचे दाणेज यांच्या निदर्शनास आले.

सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

वारंवार पाठपुरावा करूनही गुंतवणुकीची रक्कम परत न मिळाल्याने अखेर अॅड. विजय दाणेज यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून विनोद सोनार आणि आनंद परदेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर करीत आहेत


 

 

Previous Post

निंभोरा परिसरातून ६६ हजारांची गाय चोरीला

Next Post

अत्याचाराच्या प्रयत्नाला विरोध केल्याने भावजयीचा खून; दीराला जन्मठेप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कोर्टाच्या आवारात संशयित आरोपीला मोबाईलवरुन बोलू देणाऱ्या पीएसआयवर कारवाई करा

अत्याचाराच्या प्रयत्नाला विरोध केल्याने भावजयीचा खून; दीराला जन्मठेप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

ट्रॅक्टर-दुचाकीच्या भीषण धडकेत तरुण ठार; दोन गंभीर जखमी

August 20, 2026
कोर्टाच्या आवारात संशयित आरोपीला मोबाईलवरुन बोलू देणाऱ्या पीएसआयवर कारवाई करा
1xbet russia

अत्याचाराच्या प्रयत्नाला विरोध केल्याने भावजयीचा खून; दीराला जन्मठेप

August 20, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
1xbet russia

रशियन कंपनीत गुंतवणुकीचे आमिष; वकिलाची ७ लाख ६० हजारांची फसवणूक

August 20, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

निंभोरा परिसरातून ६६ हजारांची गाय चोरीला

August 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक

ट्रॅक्टर-दुचाकीच्या भीषण धडकेत तरुण ठार; दोन गंभीर जखमी

August 20, 2026
कोर्टाच्या आवारात संशयित आरोपीला मोबाईलवरुन बोलू देणाऱ्या पीएसआयवर कारवाई करा

अत्याचाराच्या प्रयत्नाला विरोध केल्याने भावजयीचा खून; दीराला जन्मठेप

August 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon