
चोपडा तालुक्यातील हातेड फाटा ते अनवर्दे फाटा दरम्यान अपघात; दुचाकीस्वाराविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
चोपडा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील हातेड फाटा ते अनवर्दे फाटा दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीवरील तिघांना दुखापत झाली असून वाहनाचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजेच्या सुमारास हातेड फाटा ते अनवर्दे फाटा दरम्यान हा अपघात घडला.
प्रवीण दिलीप शिरसाठ (रा. हातेड खुर्द, ता. चोपडा, जि. जळगाव) याने आपल्या ताब्यातील मोटारसायकल भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून फिर्यादीच्या दुचाकीला धडक दिल्याचा आरोप आहे. या धडकेत फिर्यादीसह त्यांच्या आई-वडिलांना दुखापत झाली. तसेच दुचाकीचे नुकसान झाले.
याप्रकरणी भूषण आधार पाटील (वय ३५, व्यवसाय शेती, रा. मालखेडा, ता. चोपडा, जि. जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
या तक्रारीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पोलीस नोंदीनुसार आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.








