फैजपूर (प्रतिनिधी):- भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना फैजपूर परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून कार चालक फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २१ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४.०० ते ४.३० वाजण्याच्या सुमारास भुसावळ ते पाडळसा गावादरम्यान घडली. जखमी युवक स्वप्नील सुधाकर माळी ( वय-२६) हा आपल्या मित्राच्या दुचाकीवरून प्रवास करत असताना, भरधाव वेगाने येणाऱ्या MH 15 HG 0186 क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
या अपघातात युवक खाली पडून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमीला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी २३ एप्रिल २०२६ रोजी रात्री १०.३७ वाजता गुन्हा नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.









