फैजपूर (ता. यावल) :- शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी (वय १६ वर्षे) हिला लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वारंवार अत्याचार केला. ही घटना २० ऑक्टोबर २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी २३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ३.१२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा देखील अल्पवयीन (वय १७ वर्षे) असून त्याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ६९ तसेच POCSO कायदा २०१२ अंतर्गत कलम ४, ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









