डॉ.उल्हास पाटील व डॉ.केतकी पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण
जळगाव (प्रतिनिधी) :- गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात मंगळवार दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली.तसेच स्व. इंदिरा गांधी पुण्यतीथी निमीत्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्यासह सदस्या डॉ.केतकीताई पाटील यांच्याहस्ते सरदार वल्ल्भभाई पटेल व स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रेमचंद पंडित, डॉ.सुभाष बडगुजर, प्रा.एन.जी.चौधरी, मानसोपचार तज्ञ डॉ.विलास चव्हाण, डॉ.विकास गायसमुद्रे, डॉ.सौरभ, डॉ.आदित्य जैन, बांधकाम विभागाचे परेश पाटील आदि उपस्थीत होते. याप्रसंगी मान्यवरांनी सरदार लोहपुरुष यांच्या कार्याचे स्मरण केले.