जळगाव (प्रतिनिधी) :- भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही भारत सरकारच्या आधिपत्याखालील अंतराळ संशोधन करणार्या जगातील अग्रगण्य संशोधन संस्थांपैकी एक, या संस्थेचे, सन १९६९ मध्ये आधुनिकीकरण करण्यात आले. इस्रोचे माजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ भरत चनियारा तसेच रमन सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे चेअरमन डॉ. चंद्रमाऊली जोशी गोदावरी सीबीएसईत विद्यार्थ्यांना व्याख्यानातून अंतराळ तंत्रज्ञानातील इस्त्रोचा प्रवास उलगडून सांगीतला. यावेळी त्यांचेसोबत प्रिन्सीपल निलीमा चौधरी इ मान्यवर उपस्थीत होते.
आपल्या व्याख्यानातून मुलांना इस्त्रोचा इतिहास स्पष्ट करून सांगितांना इस्रोची स्थापना १९६२ मध्ये झाली होती.भारताच्या अंतराळ संशोधनाच्या कार्यक्रमाला ’भारतीय अंतराळ संशोधन समिती’ असे म्हटले जात होतेे. डॉ. विक्रम साराभाई त्याचे प्रमुख होते. त्यावेळी मोजक्या शास्त्रज्ञांची टीम होती.आर्थिक पाठबळ देखील नव्हते. १९६२ मध्ये इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्चची स्थापना केली. डॉ. साराभाई यांच्या नेतृत्वाखाली, तिरुवनंतपुरम येथे थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशनची स्थापना केली. १९६३ मध्ये भारताने अंतराळात पहिल्या रॉकेटचे प्रक्षेपण केले होते. वातावरणातील हवेचा अभ्यास करण्यासाठी साऊडिंग रॉकेटला थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लाँचिंग स्टेशनवरून प्रक्षेपित करण्यात आले. सध्या हे केंद्र विक्रम साराभाई अंतराळ केंद्र म्हणून ओळखले जाते. इस्रो हा भारतीय विज्ञानाचा सर्वात मोठा विजय आहे., ही देशाच्या अंतराळ संपत्तीच्या देखरेखीची जबाबदारी सांभाळते. कर्नाटक राज्याची राजधानी बेंगळुरू हे भारतातील सर्वात मोठे अंतराळ केंद्र आहे,सध्या अंतराळ संशोधनात सुमारे १७००० व्यक्ती कार्यरत आहेत. त्यांनी मुलांना मुख्य केंद्र उपग्रह तंत्रज्ञान, आवाज करणारे रॉकेट, इस्रोचा इतिहास,धृवीय उपग्रह प्रक्षेपक वाहन, उपग्रह कक्षाचे वेगवेगळे प्रकार,उपग्रहाचे प्रकार,नाविक (दिक्चालन यंत्रणा) सॅटेलाईट नेव्हीगेशन सिस्टीम याबद्दल माहिती दिलीच पण भविष्यातही इस्रोचे काय उद्देश याचीही माहिती दिली.नैसर्गिक साधनसंपत्तीचे निरीक्षण करू शकणारा काल्पनिक रिमोट सेन्सिंग उपग्रह तयार करणे,मशीन्सच्या संपूर्ण ताफ्याचे एक उद्दिष्ट आहे, यापैकी काही ग्रह शोधण्यासाठी अवकाश संशोधनाचा वापर करणे.इस्रोची मुख्य उपलब्धी इस्रो ची प्रमुख केंद्रे, इस्रोची कार्ये,इस्रोची प्रमुख कामगिरी,भारतात इस्रोची किती केंद्रे आहेत,इस्रोचे पहिले मिशन कोण होते हा प्रवास आपल्या व्याख्यानातून उलगडून सांगितला तर रमन सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे चेअरमन डॉ.चंद्र माऊली जोशी यांनी मुलांना गणिताबद्दल वेगवेगळ्या पध्दती विषद करून गणित हा विषय कठीण नसून अत्यंत सोपा असल्याचे उदाहरणातूल उलगडून सांगितले. यावेळी इयत्ता आठवी ते दहावीचे विद्यार्थी व सर्व शिक्षक उपस्थित होते.