केंद्रीय योजनांची नागरिकांना मिळणार माहिती
जळगाव (प्रतिनिधी) – भारत सरकारतर्फे २५ ते ३१ जुलैदरम्यान ‘डिजिटल इंडिया’ सप्ताह होणार आहे. यात सर्वच नागरिकांना ई-गर्व्हनन्स सेवांची माहिती मिळेल. आपल्या दैनंदिन जीवनात माहिती तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्यासाठी हा सप्ताह सुरू होत असून, नागरिकांनी नोंदणी केल्यास त्यांना त्यांच्या ई-मेलवर मेसेज येईल, अशी माहिती ‘एनआयसी’ तर्फे देण्यात आली आहे.
‘डिजिटल इंडिया’ सप्ताह भारताचे तंत्रज्ञान जगासमोर दाखविणे, टेक स्टार्ट अॅपसाठी सहयोग व व्यवसायाच्या संधी शोधणे, पुढील पिढीला प्रेरणा देण्यासाठी आहे. नागरिकांना ई-गर्व्हनन्स सेवांबद्दलची माहिती देण्यासाठी व त्यांनी आपल्या जीवनात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यासाठी आहे. राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांची मालिका आयोजित केली जाईल, नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी गरजेची आहे. त्यासाठी jalgaon.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. किंवा http://www.nic.in/ diw2023-reg/ या लिंकचा वापर नोंदणीसाठी करावा. अधिकाधिक नागरिकांनी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.