चाळीसगाव ;- 132/33kv सबस्टेशन येथील 50MVA चे ट्रान्सफार्मर गेल्या काही दिवसापासून नादुरुस्त झाले होते, त्यासाठी आमदार मंगेश दादा चव्हाण सतत पाठपुरावा करत होते. परंतु 50MVA चे ट्रांसफार्मर उपलब्ध नसल्यामुळे ते मिळत नव्हते, त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील शेतकर्यांना नियमित लाईट मिळत नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागत होते . त्यासाठी आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, महावितरणचे अधिक्षक अभियंता व जिल्हाधिकारी यांना ५ दिवसांपुर्वी पत्राद्वारे निवेदन दिले होते. त्यानुसार तात्काळ 25MVA चे ट्रांसफार्मर उपलब्ध करून घेतले व 50mv. चे ट्रान्सफार्मर लवकरच उपलब्ध करून द्यावी अशी मागणी अधीक्षक अभियंता महावितरण श्री . शेख व जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या कडे केली. तसेच काल दि.६ एप्रिल रोजी आमदार मंगेश चव्हाण यांनी पाटखडकी सबस्टेशन येथे महापारेषणचे कार्यकारी अभियंता पी व्ही बोण्डे, ए के वाडे, महावितरण चे कार्यकारी अभियंता एस आर शेंडगे, उप कार्यकारी अभियंता महापारेषण बी एम डोखे यांची भेट घेत सबस्टेशन ची पाहणी केली. यावेळी वाघळीचे सरपंच विकास चौधरी, युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष रोहन सुर्यवंशी आदी उपस्थित होते. ग्रामीण भागातील 63KVA व 100KVA जे कृषीचे ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाले आहेत त्यासाठी 5000 लिटर ऑइल चे नियोजन करण्याच्या सूचना आमदार चव्हाण यांनी यावेळी केल्या.