• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 13, 2026
in Uncategorized
0
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल
जळगाव : वीजग्राहकाला बिल कमी बिल येण्याचे आमिष दाखवून वीजचोरीला मदत व मीटरमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी जळगाव शहरात एकावर गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पवन डिगंबर कांडेलकर असे आरोपीचे नाव आहे.
महावितरणच्या शनिपेठ कक्षांतर्गत नव्याने बदललेल्या स्मार्ट मीटरद्वारे वीजचोरी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर कांचननगर येथील पंढरी ओंकार येशे यांच्या घरी ५ ऑगस्ट रोजी दुपारी सहायक अभियंता नितीन तायडे, प्रधान तंत्रज्ञ संतोष पाटील, वरिष्ठ तंत्रज्ञ नीलेश चौधरी यांनी पंचासमक्ष पाहणी केली. वीज मीटरची व वीजपुरवठ्याची सखोल तपासणी केली असता स्मार्ट मीटर बायपास करून वीजवापर सुरू असल्याचे निदर्शनास आले. वीज वापरकर्ते रविंद्र पंढरी येशे यांना वीजचोरीचे १ हजाराचे बिल देण्यात आले. हे बिल त्यांनी भरले. त्यांनी दिलेल्या लेखी जबाबात म्हटले आहे की, ”२७ जुलै २०२६ रोजी स्मार्ट मीटर बसविण्यासाठी पवन डिगंबर कांडेलकर (वय अंदाजे २२ ते २४ वर्षे) याने माझे जुने मीटर बदलून नवीन मीटर लावत असताना माझ्याकडून दोन हजार रुपये मागितले. नवीन मीटरला काम करून देतो आणि ते कोणाच्याही लक्षात येणार नाही. त्यामुळे तुम्हाला विजेचे बिल अतिशय कमी येईल. असे आमिष देऊन मला लोभात पाडून, फसवून माझ्याकडून दोन हजार रुपये घेऊन मीटरमध्ये छेडछाड केली. मी त्याला वारंवार नकार देऊनही त्याने अनेक बहाणे करून मला आमिष देऊन माझ्याकडून जबरदस्तीने दोन हजार रुपये घेतले.”
सदर ग्राहकाने वीजचोरीचे देयक भरलेले असल्याने व गुन्हा तडजोडपात्र असल्याने वीज ग्राहकाविरुद्ध तक्रार देण्यात आली नाही. परंतु भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३८ अन्वये महावितरण कंपनीच्या मालकीच्या वस्तूंची छेडछाड करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. पवन डिगंबर कांडेलकर याने वीजचोरीसाठी मदत करण्याच्या अप्रामाणिक हेतूने महावितरण कंपनीच्या मालमत्तेचे नुकसान केले तसेच महावितरण कंपनीच्या वीज जोडणीत छेडछाड करून महावितरण कंपनीचा महसूल बुडावा या उद्देशाने फसवणूक केली. त्यामुळे पवन कांडेलकर याच्यावर सहायक अभियंता नितीन तायडे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

Previous Post

जळगावात १२ ते १६ ऑगस्टदरम्यान पर्यावरण महोत्सव

Next Post

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेचे २२० कोटी अनुदान

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश
1xbet russia

पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश

August 13, 2026
म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर
Uncategorized

म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

August 13, 2026
जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेचे २२० कोटी अनुदान
Uncategorized

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश

पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश

August 13, 2026
म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!