• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 13, 2026
in Uncategorized
0
जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेचे २२० कोटी अनुदान

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान
जळगाव : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या जळगाव परिमंडलात उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. परिमंडलातील 80 हजार 602 वीजग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्याकडील प्रकल्पाची एकूण स्थापित क्षमता 296 मेगावॅट आहे. 78 हजार रुपयांपर्यंत अनुदान असलेल्या या योजनेत 560 कोटींचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहे.
दरमहा तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावे यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेत जळगाव जिल्ह्यातील 50 हजार 917 ग्राहकांनी 189.39 मेगावॅट, धुळे जिल्ह्यातील 20 हजार 368 ग्राहकांनी 73.73 मेगावॅट तर नंदुरबार जिल्ह्यातील 9 हजार 317 ग्राहकांनी 33.36 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा संच घराच्या छतावर उभारले आहेत. परिमंडलातील 80 हजार 602 ग्राहकांपैकी 72 हजार 32 ग्राहकांच्या बँक खात्यात 560 कोटी 34 लाख रुपयांचे अनुदान जमा झाले असून, उर्वरित ग्राहकांचे अनुदान वळते करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील 45 हजार 724 ग्राहकांना 355 कोटी 55 लाख, धुळे जिल्ह्यातील 18 हजार 102 ग्राहकांना 140 कोटी 89 लाख तर नंदुरबार जिल्ह्यातील 8 हजार 206 ग्राहकांना 63 कोटी 90 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत केंद्र सरकारकडून छतावरील सौर ऊर्जा निर्मितीचे संच बसवणाऱ्या वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी 30 हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी 60 हजार रुपये व तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या संचासाठी 78 हजार रुपये अनुदान मिळते. एक किलोवॅटच्या सौर यंत्रणेतून दरमहा सुमारे 120 युनिट वीज तयार होते. गरजेपेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीजबिल जवळपास शून्य होते तसेच अतिरिक्त वीज महावितरणला देता येते.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी ग्राहकांना लागणारे सोलर नेट मीटर महावितरणकडून विनामूल्य पुरवण्यात येत आहेत. त्यामुळे ग्राहकांचे पैसे वाचण्यासोबत त्यांना मोबाईल फोनवरच वीजनिर्मिती, वीज वापर, अतिरिक्त युनिट इत्यादी माहिती दररोज मिळते. त्यानुसार त्यांना वीजबिल कमी करण्यासाठी नियोजन करता येत आहे.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना www.pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी लागते. महावितरण ही या योजनेची अंमलबजावणी करणारी राज्यातील नोडल एजन्सी आहे. महावितरणने यासाठी एक स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना व पुरवठादारांना महावितरणच्या कार्यालयात येण्याची आवश्यकता राहत नाही. नोंदणी केल्यापासून अंतिम मंजुरीनंतर प्रकल्प सुरू करेपर्यंत ‘फेसलेस’ व ‘पेपरलेस’ पद्धतीने काम चालू राहते. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत गतिमानता आली आहे.
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत ग्राहकांना जवळपास मोफत वीज मिळते. शिवाय योजनेत 78 हजार रुपयांपर्यंत अनुदान आहे. वीजग्राहकांना नेट मीटरही महावितरणकडून देण्यात येते. जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील जास्तीत जास्त वीजग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
– आय.ए. मुलाणी, मुख्य अभियंता, महावितरण, जळगाव परिमंडल

Previous Post

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

Next Post

म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश
1xbet russia

पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश

August 13, 2026
म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर
Uncategorized

म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

August 13, 2026
जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेचे २२० कोटी अनुदान
Uncategorized

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश

पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश

August 13, 2026
म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!