भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ विभागातील सहा कर्मचाऱ्यांना आज दिनांक ८ रोजी “मॅन ऑफ द मंथ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एस एस केडिया, विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी मे मध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल गौरविले.
गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या आणि चालण्यास असमर्थ असलेल्या सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला विशेष सहकार्य करणारे मुख्य कल्याण निरीक्षक श्रीकांत सूर्यवंशी यांनी त्यांच्या गंभीर आजारात खर्च झालेल्या सुमारे ४ लाख रुपयांची परतफेड करण्यात मदत केली. हसन अली लोको पायलट गुड्स दिनकर लक्ष्मण तंत्रज्ञ आणि महेंद्रसिंग यांनी त्यांच्या कर्तव्यादरम्यान हॉट एक्सल काळजीपूर्वक आणि तत्परतेने तपासून रेल्वेचे संभाव्य नुकसान वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सर्वसामान्य नागरिकांची वाहतुकीची गैरसोय होऊ नये म्हणून ब्रेकडाऊन दरम्यान रस्ता वाहतुकीला होणारा अडथळा वाचविण्याचे महत्त्वपूर्ण काम दीपककुमार लाईनमन यांनी अत्यंत दक्षतेने केले. कृष्णा कोळी कॉन्स्टेबल आरपीएफने ड्युटीवर असताना सुमारे २४ लाख रुपयांचे चोरीचे सोने पकडून रेल्वे प्रवाशांच्या मालमत्तेचे नुकसान होण्यापासून वाचवले. उपरोक्त नमूद कर्मचार्यांनी रेल्वेतील उत्कृष्ट कामासाठी वक्तशीरपणाची खात्री करून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ज्यामुळे रेल्वेचे नुकसान टळले.