साईराम प्लास्टिक्स् अॅण्ड इरिगेशन द्वितीय
जळगाव, (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार प्रशिक्षण देण्यात नशिराबाद येथील उद्योजक श्रीराम पाटील यांची श्री साईराम प्लास्टिक्स् अॅण्ड इरिगेशन ही कंपनी द्वितीय आली आहे. त्याबाबतचे प्रमाणपत्र जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे जागतिक युवा कौशल्य दिनी देऊन गौरविण्यात आले.
शेतकर्याच्या हिताचे… शेतकर्याच्या मुलाचे फक्त.. हे घोषवाक्य घेऊन शेतकर्यांच्या हितासाठी कृषी सिंचन व ई-बाईक क्षेत्रात कंपनीने भारतभरात मोठी झेप घेतली आहे. उद्योजक श्रीराम पाटील हे ग्रामीण भागातून आलेले असल्याने त्यांना ग्रामीण भागातील सुशिक्षित युवकांना रोजगाराच्या संधी बाबत येणार्या अडचणींची जाणीव आहे. हे ओळखून ग्रामीण भागातील व शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. देशभरात वितरकांचे जाळे असलेल्या श्री साईराम प्लास्टिक्स् अॅण्ड इरिगेशनच्या यशात या गौरवामुळे मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गंत सन 2022-23 या आर्थिक वर्षात महाराष्ट्र शासनातर्फे जूनमध्ये “शासन आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत नूतन मराठा महाविद्यालयात रोजगार मेळावा घेण्यात आला होता. याची दखल घेत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त वि.जा.मुकणे यांच्या हस्ते कंपनीस प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. हा सत्कार कंपनीतर्फे कार्मिक अधिकारी ईश्वर पाटील व जनसंपर्क अधिकारी डॉ.पंकज पाटील यांनी स्विकारला.