जळगाव शहरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील आत्महत्यांचे प्रमाण थांबण्याचे नाव घेत नाही आहे. शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी शहरातील मेहरूण परिसरात नातेवाईकांकडे कामानिमित्त राहण्यासाठी आलेल्या ४२ वर्षीय प्रौढ व्यक्तीने राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हिरामण मंगल शिंपी (वय-४३, रा. उधना, जि. सुरत ह.मु. जयभवानी नगर, मेहरूण, जळगाव) असे मयत प्रौढ व्यक्तीचे नाव आहे. गुजरात येथील उधना येथील रहिवाशी हिरामण मंगल शिंपी हे पत्नी व दोन मुलींसह गेल्या दिड महिन्यांपासून जळगाव शहरातील मेहरूण परिसरात राहणारे शालक पवन मधुकर शिंपी यांच्याकडे वास्तव्याला होते. शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी घरातील सर्व सदस्यांना नातेवाईकांकडे जेवणसाठी बोलविण्यात आले होते. दुपारी जेवण झाल्यानंतर हिरामण शिंपी हा घरी आला. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास राहत असलेल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.
आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी आरडाओरड केली, शेजारी राहणाऱ्या नागरीकांनी तात्काळ धाव घेवून हिरामणला खाली उतरवत तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विकास सातदिवे करीत आहे. मयताच्या पश्चात आईवडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.