• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात फ्रेशर पार्टी उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 14, 2023
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – शाळेतून कॉलेजमध्ये पाऊल टाकताना मुलांचा एका नव्या जगात प्रवेश होत असतो. कॉलेज लाईफ मध्ये प्रवेश करताना मुलं काहीशी बावरलेली असतात. या विद्यार्थ्यांना कॉलेजची तसेच सीनियर्सची ओळख व्हावी, यासाठी फ्रेशर पार्टीचे आयोजन केले जाते.

याच अनुषंगाने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी freshers Frenzy या फ्रेशर पार्टीचे दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजन केले होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाता प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), डॉ. ईश्वर जाधव ( रजिस्ट्रार), डॉ .नितीन भोळे(प्रमुख,बेसिक सायन्सेस अँड हुम्यानिटी), प्रा. महेश पाटील (विद्युत विभाग प्रमुख), प्रा. तुषार कोळी (यंत्र विभाग प्रमुख), डॉ.अनिलकुमार विश्वकर्मा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स, विभाग प्रमुख) महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी त्यांची गुणवैशिष्ट्ये सादर करावी, जेणेकरून तुमच्या व्यक्तीमत्वात प्रगल्भता येईल. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून परस्पर संबंध व सर्वांगीण विकास वाढतो. तसेच या संपूर्ण दिवसभर चालणाऱ्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी हिरीरीने सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा आनंद घ्या असे आवाहन केले.

दिवसभराच्या कार्यक्रमाच्या  नियोजनामध्ये विद्यार्थ्यांचे सुप्तगुण, आत्मविश्वास तसेच त्यांमध्ये आपुलकीची भावना  निर्माण व्हावी या पद्धतीने वेगवेगळ्या Rounds चे आयोजन करण्यात आले होते. यात  मुख्यत: पहील्या फेरी मध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी  वेगवेगळ्या Bowl मधून चिठ्ठी काढून त्यात दिलेले Task पूर्ण करायचे होते . Fish bowl  नावाच्या या फेरीत पहिल्या वर्षाच्या सर्व मुला- मुलींनी अतिशय आनंदाने सहभाग नोंदवला. तद्नंतर दुसऱ्या फेरीसाठी निवड झालेल्या विदयार्थ्यांना Ramp walk करून काही प्रश्नांची उत्तरे देऊन आपले शारीरीक तसेच बौध्दीक कौशल्य  दाखवायचे  होते.त्यानंतर अंतिम फेरी मध्ये निवडलेल्या विद्यार्थ्यांना त्यांना अवगत असलेली कला सादर करायची होती. Face -off च्या या फेरीत विद्यार्थ्यांनी Dance, singing,  Mimicry अश्या वेगवेगळ्या  कला सादर केल्या. आणि या व सर्व फेरीमधुन Mr. Fresher आणि Miss.Fresher यांची निवड करण्यात आली यात Mr. Fresher म्हणुन गणेश कोलते व Miss Fresher म्हणून सानिका कासार हे विजेते ठरले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रुती सोनार, चेतन बाविस्कर, प्राची गिरासे, श्वेता

बोरसे, चंचल पाटील, अक्षता भोळे, कुणाल बागुल, जय खडसे, प्रथमेश पवार, श्रुती देशमुख, दुर्गेश सोनार, सेजल सातव, दीक्षा रामराजे, हर्षाली मोरे, नम्रता संगिले, स्वामी पवार, वैष्णवी पिंगळे व साक्षी बारी या सर्व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केले.

तसेच कार्यक्रमा वेळी परीक्षक म्हणून प्रथम फेरीसाठी प्रा. हेमंत नेहेते, प्रा. मयूर ठाकूर, द्वितीय फेरीसाठी प्रा.अतुल बऱ्हाटे,तृतीय फेरीसाठी प्रा. देवपाल यादव, प्रा. देवेंद्र फेगडे व अंतिम फेरीसाठी प्रा. हेमंत इंगळे प्रा.सरोज भोळे, प्रा. तुषार कोळी प्रा. शफिकुर रहमान यांनी सहकार्य केले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांना प्रा.अमित म्हसकर, डॉ. नितीन भोळे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे प्रथम वर्षाच्या सर्व प्राध्यापक वर्गाचे कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले.

गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर व सदस्य डॉ. केतकी पाटील मॅडम यांनी कार्यक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने व उत्साहाने सहभाग नोंदवला व भरघोस प्रतिसाद दिला.


 

 

Previous Post

मेहरुणमधील प्रौढाने घेतला गळफास, आत्महत्या सुरूच..!

Next Post

भीषण अपघातात पती-पत्नीसह सुनेचा मृत्यू, चिमुकला बचावला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भीषण अपघातात पती-पत्नीसह सुनेचा मृत्यू, चिमुकला बचावला

भीषण अपघातात पती-पत्नीसह सुनेचा मृत्यू, चिमुकला बचावला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान
1xbet russia

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

May 22, 2026
1xbet russia

May 22, 2026
उपनिबंधक जगदीश बारी यांच्या बँक लॉकरमध्ये आढळले १ कोटी ७ लाखांचे सोने व रोख रक्कम!
1xbet russia

उपनिबंधक जगदीश बारी यांच्या बँक लॉकरमध्ये आढळले १ कोटी ७ लाखांचे सोने व रोख रक्कम!

May 22, 2026
सिगारेटच्या पैशांवरून वाद; जळगावात दुकानदाराला चाकूने धमकी
1xbet russia

सिगारेटच्या पैशांवरून वाद; जळगावात दुकानदाराला चाकूने धमकी

May 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

May 22, 2026

May 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon