जळगाव शहरातील घटना, कारण अस्पष्ट
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एका व्यापाऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या प्रयत्न केल्याची घटना दि. ४ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आली होती. दरम्यान शनिवारी दि. ६ जुलै रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
विनोद पूनमचंद जैन (चोरडिया वय ४४, रा. प्रेम नगर, जळगाव) असे मयत व्यापाराचे नाव आहे. ते प्रेम नगर येथे आई-वडील, पत्नी, मुलगा, तीन भाऊ, दोन बहिणी यांच्यासह राहत होते. पंचमुखी हनुमान मंदिर परिसरामध्ये त्यांचे दुकान होते.(केसीएन)व्यवसाय करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान गुरुवारी दि. ४ जुलै रोजी सकाळी उठल्यावर विनोद यांनी साडेआठ वाजेच्या सुमारास विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान कुटुंबीयांना समजताच तात्काळ विनोद जैन यांना खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. (केसीएन)२ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेरीस शनिवारी दि. ६ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
यानंतर शवविच्छेदनकामी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला होता.(केसीएन)दरम्यान या घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. व्यापाराच्या मृत्यूची माहिती मिळताच रुग्णालयामध्ये जळगावतील व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती.