• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

प्रचंड भीती, ताणतणावातून टोकाचा विचार करताय ? थांबा, डॉक्टरांना एकदा भेटा..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 29, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्रचंड भीती, ताणतणावातून टोकाचा विचार करताय ? थांबा, डॉक्टरांना एकदा भेटा..!

शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील मनोविकार तज्ज्ञांनी दिली माहिती

जळगाव (प्रतिनिधी) : अनेकदा आपल्या आयुष्यात भयंकर अनपेक्षित प्रसंग येतात. ताण वाढतो. कधी आपला अपमान होतो, कधी कुणी कमी लेखतं, कधी आर्थिक अडचणी, कधी प्रेमभंग, कधी कुणी छळतं, सातत्याने प्रयत्न करूनही नोकरी मिळत नाही, त्यामुळे समोर वाटच दिसत नाही. अशावेळी निराश होणं, स्वतःवरचा ताबा सुटणं साहजिकच असतं. पण, स्वतःला सावरून पुन्हा उभं राहण्याची गरज असते. अशा वेळी आपल्या जवळच्या व्यक्तीला याबाबत माहिती देऊन समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक विचार करा. नाहीतर एकदा तर मनोविकार तज्ज्ञांना भेटाच, असा सल्ला मनोविकार तज्ज्ञ डॉ. यश महाजन यांनी दिला आहे.

जीव नको झालाय, जीव द्यावा असे वाटणे, सतत निराश वाटणे, मनात आत्महत्येसारखे विचार येत असल्यास खचून न जाता आपल्या मनाची स्थिती आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगा, त्यावर उपाय शोधा, असेही त्यांनी सांगितले. मागील ६ महिन्यांत जिल्ह्यात आत्महत्येच्या घटनांत वाढ झाली आहे. यामध्ये शेतकरी आत्महत्या, तरुणांच्या आत्महत्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नैराश्य आल्यास, उदास, नाराज वाटत असेल तर जवळील व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोला, असेही डॉ. महाजन म्हणाले.

“”आपल्या मनानुसार सर्व गोष्टी घडतील असे नाही. बरेचदा समजुतीने घ्यावे लागते. आलेली कठीण परिस्थिती ही कायमस्वरूपी नसते. ती तात्पुरती असते. नेहमी तशीच स्थिती राहील असे नाही. त्यामुळे धीर सोडू नये, संयम बाळगावा, कठीण परिस्थितीत चांगल्यात चांगलं काय करता येईल ते पहा. ‘टेन्शन’ आल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मनोविकार विभागात तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.””
डॉ. गिरीश ठाकूर, अधिष्ठाता.

आत्महत्येची कारणे
● बेरोजगारी : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. व्यवसायासाठी भांडवल मिळत नाही. खिशात खर्चायला देखील पैसे राहत नाही. त्यामुळे बेरोजगारांमध्ये नैराश्य निर्माण होत असून, ते टोकाचा निर्णय घेत आहेत.
● नापिकी, कर्जबाजारीपणा : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे कर्जबाजारीपणाला व नापिकीला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहेत.
● तणाव : विविध कारणातून वाढलेला तणाव आत्महत्येचे मोठे कारण दिसून येत आहे. मात्र, याला आत्महत्या हा पर्याय नाही. समस्या कितीही मोठी असली तरी त्यावर मार्ग निघत असतो.

ताणतणावाच्या टिप्स
● छंद जोपासा : नकारात्मक विचार येत असतील तर चांगल्या पुस्तकांचे वाचन करावे.आपल्या आवडीचे छंद जोपासावेत.
● मित्रांसोबत वेळ घालवा : चांगल्या मित्रांसोबत वेळ घालविल्याने एकाकीपणा कमी होतो. त्यामुळे जास्त एकटे राहणे टाळा.
● सकारात्मक विचार : आयुष्यामध्ये सकारात्मक विचार करायला हवा. सकारात्मक विचारामुळे ऊर्जा निर्माण होते आणि मन प्रसन्न राहते.
● पौष्टिक आहार घ्या : पौष्टिक आहार घ्यावा. नियमित व्यायाम किंवा योगा केल्यास मन प्रसन्न राहते.
● संवाद साधा : आत्महत्येसारखे विचार मनात येत असल्यास आपल्या जवळील व्यक्तींशी संवाद साधा, मन हलके करा.

 

 

 

 

 

 

 


 

Tags: Extreme fear and stress? Waitsee the doctor once..!
Previous Post

विजेचा धक्का लागून अल्पवयीन तरुणाचा मृत्यू

Next Post

लोखंडी कोयत्यासह हद्दपार गुन्हेगाराला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
लोखंडी कोयत्यासह हद्दपार गुन्हेगाराला अटक

लोखंडी कोयत्यासह हद्दपार गुन्हेगाराला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी
1xbet russia

पाथरीच्या शिक्षकासह शिरसोलीच्या आरोग्यसेविका, मदतनिसाचे वेतन थांबविले : सीईओंचा दणका

June 30, 2025
पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी
1xbet russia

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

June 30, 2025
अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !
1xbet russia

अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !

June 30, 2025
रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान
1xbet russia

रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान

June 30, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

पाथरीच्या शिक्षकासह शिरसोलीच्या आरोग्यसेविका, मदतनिसाचे वेतन थांबविले : सीईओंचा दणका

June 30, 2025
पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

June 30, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon