• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 30, 2026
in Uncategorized
0
कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

बोदवड पंचायत समितीमध्ये एसीबीची कारवाई

बोदवड (वार्ताहर) : वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यासाठी ६०० रुपयांची लाच घेताना बोदवड पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यक उमेश शामकांत सपकाळे (वय ४९) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि. ३० जुलै) पंचायत समितीच्या कार्यालयात करण्यात आली.

५२ वर्षीय तक्रारदार हे वाद्य कलाकार असून त्यांनी शासनाच्या वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेचा लाभ मिळण्यासाठी ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाईन अर्ज केला होता. अर्जाची प्रत त्यांनी पुढील कारवाईसाठी पंचायत समिती बोदवड येथे जमा केली होती. या अर्जावर प्रस्ताव तयार करून तो जिल्हा परिषद जळगाव येथे पाठवण्यासाठी कनिष्ठ सहाय्यक उमेश सपकाळे यांनी सुरुवातीला ३,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार नोंदवली. तक्रारीच्या पडताळणीदरम्यान तडजोडीअंती आरोपीने ६०० रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. दि. ३० जुलै रोजी पंचायत समिती कार्यालय, बोदवड येथील सामान्य प्रशासन कक्षाच्या बाहेरील गॅलरीमध्ये ६०० रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारताना उमेश सपकाळे याला तातडीने ताब्यात घेण्यात आले.

याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही यशस्वी कारवाई नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, आणि अंमलदार बाळू मराठे, राकेश दुसाने व अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.


 

 

Previous Post

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

Next Post

बनावट शालार्थ घोटाळ्यात संजय गरुडांचा चुलतभाऊ जेरबंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बनावट शालार्थ घोटाळ्यात संजय गरुडांचा चुलतभाऊ जेरबंद

बनावट शालार्थ घोटाळ्यात संजय गरुडांचा चुलतभाऊ जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गंभीर घटना : बालकाला पळवून नेत केले लैंगिक अत्याचार !
1xbet russia

२० रुपयांचे आमिष दाखवून जामनेरमध्ये ११ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार; ३० वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा

September 22, 2026
८०० रुपयांच्या वादातून मामे भावाची दगडाने हत्या
क्राईम

८०० रुपयांच्या वादातून मामे भावाची दगडाने हत्या

September 22, 2026
माशांचे जेवण वडिलांना न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मित्राची हत्या; दोन आरोपी अटकेत
क्राईम

माशांचे जेवण वडिलांना न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मित्राची हत्या; दोन आरोपी अटकेत

September 22, 2026
भुसावळ एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग
क्राईम

भुसावळ एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गंभीर घटना : बालकाला पळवून नेत केले लैंगिक अत्याचार !

२० रुपयांचे आमिष दाखवून जामनेरमध्ये ११ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार; ३० वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा

September 22, 2026
८०० रुपयांच्या वादातून मामे भावाची दगडाने हत्या

८०० रुपयांच्या वादातून मामे भावाची दगडाने हत्या

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon