जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलच्या मेन गेट जवळील भिंतीलगत रोडवर उभी केलेली २५ हजार रुपये किमतीची मोटार सायकल अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी उत्तम वामन सुरवाडे (वय ५२, रा. भागदरा, पो. मोयगाव, ता. जामनेर, जि. जळगाव) यांची हिरो कंपनीची काळ्या व पर्पल रंगाची मोटार सायकल (क्र. एम एच-१९ सिपि ०२३६) दिनांक २७/१०/२०२६ रोजी दुपारी ०१ वाजेपासून ते ०४:३० वाजेदरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सिव्हिल हॉस्पिटलच्या मेन गेटजवळ लावली होती.
चोरट्याने ती परस्पर लांबवून नेल्यामुळे फिर्यादीच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक राजेश विठ्ठल पदमर (नेमणूक – जिल्हापेठ पोलीस स्टेशन, जळगाव) हे करीत आहेत. या प्रकरणात अद्याप आरोपीला अटक झालेली नाही.








