कजगाव ता. भडगाव ( प्रतिनिधी ) – येथील जेष्ठ पत्रकार व समता परिषदेचे तालुका अध्यक्ष भानुदान हिलाल महाजन यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे सदरील निवडीचे नियुक्तीपत्र भानुदास महाजन यांना अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने केंद्रीय कार्याध्यक्ष युसूफ खान केंद्रीय महासचिव सुरेश सवळे प्रदेश अध्यक्ष कैलास देशमुख यांच्या स्वाक्षरी ने देण्यात आले आहे महाजन यांच्या निवडीबद्दल कजगाव पत्रकार बांधवांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जेष्ठ पत्रकार प्रमोद ललवाणी आत्माराम पाटील संजय कोतकर नितीन सोनार संजय महाजन नाना पाटील अमिन पिंजारी कैलास महाजन अमीन शाह निलेश पाटील दिपक अमृतकर संजय कोळी विकास महाजन आदी उपस्थित होते महाजन यांच्या निवडी बद्दल त्यांच्यावर सर्वच स्थरावरून अभिनंदन होत आहे.